सर्जा राजासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग
मोहोळ तालुका /प्रतिनिधी- मोहोळ तालुक्यातील अनगर येथील आठवडा बाजार बैलपोळ्याच्या साहित्याने गजबज होऊन गेला होता. शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा पोळा सण काही दिवसांवर येऊन ठेपल्याने गावगावचे आठवडा बाजार पोळा सणासाठी लागणाऱ्या विविध साहित्याने गजबजुन गेले आहेत. आठवडा बाजारात शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत आपल्या सर्जा राजासाठी विविध साहित्य खरेदी केले .चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनगर येथील गुरुवारच्या आठवडा बाजारात ग्रामीण भागातील व्यापाराने घुंगरू, झालर, दोरी , कवळी, या वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणले आहेत. जवळजवळ शंभर पेक्षा जास्त विक्रेते बाजारपेठेत आले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा साहित्य दरात मोठी वाढ झाली आहे .वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाला एक दिवस आराम मिळावा या उद्देशासह त्याबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यासाठी भारतीय संस्कृतीत पोळा या सणाला ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून तो उत्साहात साजरा केला जातो. चालू वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोळा सण धुमधडाक्यात साजरा करण्यास बळीराजा आतुर झाला आहे. बाजारपेठेत विविध साहित्याचे विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होईल अशी अपेक्षा साहित्य विक्रेत्यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया_
आठवडा बाजारात दरवर्षी प्रमाणे यंदाही बैलासाठी निरनिराळे गोंडे, पितळी साखळ्या, कासरे, सुती गोंडे, सिंगातील गोंडे ,केसरी मनीमाळा, चंगाळ्या, मोरक्या, घुंगरे , कवडेमाळ, तिरंगी माळ ,चमडीगोंडा आदि झाले आहेत आपल्या सर्जा राजाला नजर लागू नये म्हणून काळ्या धाग्यात बनवलेली दिमटनी बाजारात दाखल झाले आहे. बैलजोडी सजविण्याचा खर्च हा कमीत कमी एक ते दोन हजार रुपयापर्यंत होतो. सुनील घाटुळे , प्रगतशील शेतकरी अनगर मोहोळ तालुक्यातील अनगर येथील आठवडा बाजारात पोळा सणासाठी लागणाऱ्या साहित्याची विक्री करण्यासाठी आलेले विक्रेते छायाचित्रात दिसत आहेत.
Discussion about this post