सध्या पोळ्याच्या निमित्ताने बाजारात विविध प्रकारचे रंगीबेरंगी सजावटीचे साहित्य विक्रीसाठी आले आहे.
साहित्यात वेसण, दोर, माळ, चौरंग, बेडगी, रंग, गुलाल, मठाठी, मोरकीचा आदींचा समावेश आहे. वर्षभर शेतात शेतकऱ्यांसोबत राबलेल्या बैलांच्या प्रति कृतज्ञता भावना म्हणून बैलपोळा साजरा केला जातो.
बैलांना रंगरंगोटी व सजावट करून त्यांची पारंपरिक वाद्यांसह वाजतगाजत गावातून मिरवणूक काढली जाते. गावातील देवाचे दर्शन घडविले जाते. बैलांची पूजा करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालण्याची संस्कृती आहे.
काही वर्षांत शेतीसाठी ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने बैलांची संख्या कमी होत आहे. त्यातच बैलांच्या सजावटीच्या साहित्याच्या दरातही ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Discussion about this post