सुरगाणा शहराला 88 वर्षा पासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा
प्रीतिनिधी :-विजय कानडे सुरगाणा+
सुरगाणा शहराला 88 वर्षांपासून अखंड हरीनाम सप्ताहाची परंपरा लाभलेली आहे. शहरातील अतिप्राचीन काळाराम मंदिर येते सप्ताहची24/8/2024 पासून सुरवात झाली. पहिल्या दिवसापासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन माऊली ह. भ. प कदम माऊली व हरीपाठ घेत असे आणि सर्व भाविक असतात
तसेच सात दिवस रोज कीर्तनकार पहिल्या दिवशी ह. भ. प ज्ञानेश्वर महाराज सातबाभळ, असे सात दिवस कीर्तन कार कीर्तन करत असे व रॊज येणाऱ्या सर्व भाविकांना अन्नदान करत असतात.
शेवटच्या दिवशी ह. भ. प टेकाडे महाराज यांचं कीर्तन व सर्व तालुक्यातील लोकांना महाप्रसाद नंतर त्यानंतर गावातून पालखी सोहळा होतो आणि मंदिरा समोर दहीहंडी कार्यक्रम होतो आणि सप्ताहची सांगता होती.या कार्यक्रमासाठी देवस्थान कमेटी आणि पंचकोशिती नागरिकांनी या कार्यक्रमसाठी परिश्रम घेता.
Discussion about this post