सन्मान रॅलीचा उद्देश
आज दिनांक 02/09/24 रोजी छत्रपती संभाजी नगर येथे सकल मातंग समाजाच्या वतीने न्यायालयाने दिलेल्या अबकड वर्गीकरणाच्या समर्थनार्थ सन्मान रॅली काढण्यात आली होती. या रॅलीचा मुख्य उद्देश न्यायालयाच्या निर्णयाला समर्थन देऊन, समाजातील विविध पक्षांच्या एकत्रीकरणाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचविणे होता.
वाजत गाजत रॅलीचा शुभारंभ
रॅलीची सुरुवात पडत्या पावसातही मांगाच्या शुरवीरांनी वाजत गाजत व नाचत जल्लोष साजरा करीत केली. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन झाली आणि त्यांनी डॉ. आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यापर्यंत थेट पायी प्रवास केला.
परमपरागत गितांचा संगम
रॅलीदरम्यान शिव गर्जना, भीमगर्जना आणि आण्णा भाऊ साठे यांच्या गितांनी वातावरण लहुमय झाले होते. पडत्या पावसातही समाजविरांकडून अखंड जल्लोष आणि उत्साह पाहून जणुकाही छत्रपती संभाजी नगर देखील कौतुकाने आपला प्रतिसाद देत होते.
या सन्मान रॅलीमुळे समाजातील एकतेचा आणि न्यायाच्या हेतूचा महत्त्वपूर्ण विषय चर्चेत आणण्याचा यशस्वी प्रयत्न झाला.
Discussion about this post