पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे जंगी स्वागत
पाळधी, ता. धरणगाव : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे
प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांचे जीपीएस मित्र मंडळाच्यावतीने जंगी स्वागत करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेने दीक्षा भूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा काढली आहे. यावेळी जीपीएस मित्र मंडळाचे प्रतापराव पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी यात्रेचे जंगी स्वागत केले. यावेळी अनिल सोनवणे, प्रशांत बिचवे यांनी सत्कार केला. यावेळी सरचिटणीस विश्वास आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, सचिन गोसावी, जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, हल्ला कृती समिती जिल्हाध्यक्ष भगवान मराठे, ग्रामीण तालुकाध्यक्ष नगराज पाटील, गोपाल सोनवणे, मुन्ना झवर, मुकुंदराव नन्नवरे, आलिम देशमुख, दीपक झवर, दीपक श्रीखंडे, महेश मोरे, महेंद्र चौधरी, महेश झवर यांच्यासह जीपीएस परिवारातील सर्व सदस्य, नागरिक उपस्थित होते. यावेळी पाळधीचे स. पो. नि. प्रशांत कंडारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Discussion about this post