वारूळवाडी वार्ताहर प्रशांत माने :-ग्रामोन्नती मंडळाचे श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन सेमी इंग्रजी माध्यम नारायणगाव या शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण पूरक शाडूच्या मातीपासूनगणपती बनविणे कार्यशाळा घेण्यात आली एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी या शाळेतर्फे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यशाळेसाठी प्रशिक्षक म्हणून श्री अनिल भालेराव सर , त्यांच्या पत्नी सौ मधुश्री भालेराव यांनी मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय श्री.अनिल तात्या मेहेर . बालनिकेतन चे चेअरमन माननीय श्री रविंद्र पारगावकर सर. मुख्याध्यापिका सौ.छाया भुजबळ मॅडम उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी श्री अनिल भालेराव सर यांनी गणपती बसवण्यासाठी पारंपारिक पद्धतीने कसा बसवायचा याबाबतचे मार्गदर्शन केले. तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी श्री गणेशाची कथा व महत्त्व सांगितले त्यामधून मुलांना व पालकांना पारंपारिक माहिती मिळाली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वारुळे मॅडम व पाहुण्यांची ओळख बुऱ्हाडे मॅडम यांनी केली. तसेचआभार सौ पिंगट मॅडम यांनी मानले. कार्यशाळेसाठी बहुसंख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित राहिले व कार्यक्रमाचा आनंद घेतला.सदरच्या कार्यशाळेची सांगता श्री गणेशाच्या आरतीने अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात करण्यात आली.
Discussion about this post