प्रशांत टेके पाटील (कोपरगाव तालुका प्रतिनिधी ) — कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नेहमीप्रमाणे संवेदनशील वाटली नाही. ही पंचवार्षिक निवडणूक काळे विरुद्ध कोल्हे अशी पारंपरिक पद्धतीने झाली नाही. परीणामी एका बाजूला साखर कारखानदार आणि समोर सर्व सामान्य माणुस अशी लढत झाली. संपूर्ण मतदार संघातील प्रत्येक गावात व शहरातील प्रत्येक वार्डात एका पार्टीने 19 नोव्हेंबर पासूनच पैशाचे वाटप सुरू केलेले दिसत होते. कर्मचाऱ्यांची यंत्रणा पैसे वाटण्यात सक्रिय होती.मंगळवार दुपार पासूनच कर्मचारी व ज्या त्या गावातील स्थानिक कार्यकर्ते मतदारांना पैसे व देशी दारूच्या बाटल्या वाटत होते.रात्रभर वाटपाचा कार्यक्रम चालू होता.
निवडणुकीच्या दिवशी दुपारच्या तीन वाजेपर्यंत हा सावळा गोंधळ चालुच होता.पैसे वापरानंतर मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडताना दिसत होते.तरी काही मतदार दुसऱ्या उमेदवाराच्या बाजूने पैसे येण्याची वाट पाहत घरीच थांबलेले होते. त्यातले काही मतदार चार वाजेनंतर मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर गेले.तर काहींनी अजुन पैसे येतील या आशेवर घरीच थांबणे पसंत केले.त्यामुळे मतदानाची टक्केवारी 65 च्या पुढे गेलीच नाही. मताचे दान करायचे की मत विकायचे असतात हे जोपर्यंत मतदाराना ज्ञात होत नाही, तो पर्यंत मातब्बर मंडळी साम, दाम, दंड व भेद या नीतीचा अवलंब करून सर्वसामान्य माणसाला गुलाम करून त्यांच्या वर राज्य करीत राहणार हे निर्विवाद सत्य आबाधीत राहणार हे निश्चित आहे.तरी पण मतदार राजाने मतांचा कौल कोणत्या उमेदवाराच्या बाजूने दिलेला आहे हे पाहण्यासाठी 23 तारखे पर्यंत थांबावे लागणार आहे.
Discussion about this post