प्रतिनिधि- हातकणंगले
युगपुरुष सम्राट क्षत्रियकुलावंतस छत्रपती शिवाजी महाराजांनी एत्तदेशिय रयतेचा महाराष्ट्रधर्म साकारला . त्यांच्या पश्चात धर्मवीर ( *धर्मवीर या करता कि शिवछत्रपतींनी सांगितलेला महाराष्ट्रधर्म रयत रक्षणाचा धर्म छत्रपती शंभू राजांनी फक्त अंगिकारलाच नाही तर शेवटच्या श्वासापर्यत त्याचे पालनही केले*)
छत्रपती शंभू राजे यांनी स्वराज रक्षण करुन महाराष्ट्रधर्माचे यथोचित पालन केले. पण महाराष्ट्राच्याच कमनशिबाने धर्मवीर छत्रपती शंभूराजे धर्मांध औरंगजेबाच्या कधीही न सुटणा-या कैदेत गवसले ( *का कोणी पकडुन दिले….?*)
आणि त्यांची अमानवी हत्या झाली.
पण त्यांच्या पश्चातही शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रधर्माची धुरा येथल्या रणमर्द मावळ्यांनी मराठी वीरांनी आपल्या बाहुबळावर पेलली.
आणि यात सर्वात प्रकर्षाने नाव घेतल जात ते सरसेनापती रणमर्द संताजी घोरपडे यांचे.
सरसेनापतींनी शिवछत्रपती व शंभूछत्रपती यांचा रयत रक्षणाचा धर्म म्हणजेच महाराष्ट्रधर्म आपल्या व आपल्या रणमर्द सहाकार्याच्या मर्दनुकीने जागता राखला.
पण केवळ पुन्हा महाराष्ट्राच्या दुर्देवाने सरसेनापतींचीही हत्या झाली.
इतिहासातील पराक्रमी रणमर्दांची समाधीस्थळे ही फक्त समाधी नसुन येणाऱ्या पिढ्यांना महाराष्ट्रधर्माच्या वारसदारांना शक्तीस्थळे म्हणून नेहमीच खूणावत असतात अथक प्रेरणादायी ठरतात.
ऐतिहासिक कुरुंदवाड घाटावर सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधीस्थळ आहे.
आपला इतिहासपुरुष हा निर्विवाद महापराक्रमी आहे पण तसा तो अबोलही आहे. सदरची समाधी ही रणमर्द सरसेनापती संताजी घोरपडे यांचीच आहे याला आपला मुक इतिहासपुरुष फारशी साक्ष देत नाही म्हणजेच या समाधीस आपल्या ऐतिहासिक कागदपत्रात तुरळकच संंदर्भ मिळतात.
आज जवळजवळ महाराष्ट्रभर असलेल्या रणमर्द मराठी वीरांच्या समाधीस संंदर्भ आहेतच असे नाही म्हणुन ती समाधी खोटी आहे ही ती नाहीच अस आपन ठामपणे म्हणूच शकत नाही.
याला लोककथांचाच व तसाच लोकभानणांचा मोजता न येणारा तसेच शब्दबध न होणारा प्रचंड आधार असतो.
आम्ही जेव्हा कुरुंदवाडला जातो तेव्हा या शक्तीस्थळावर नतमस्तक झाल्याशिवाय पुढल पाऊल टाकत नाही नव्हे महाराष्ट्रधर्म याला परवानगीच देत नाही…………!
*जै शिवराय जै महाराष्ट्रधर्म*
🌙🌞🚩🇮🇳📒🖊️⚔️⚖️
*गौरव सुनिता संजय जाधव*
*सदरच्या शक्तीस्थळा नजीक सरसेनापतींच्या नावाची व प्रतिमेची पाटी ही शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान या संघटनेने लावली आहे* ……..!
Discussion about this post