आरमोरी तालुक्यातील भाकरोंडी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या चिचटोला या गावात जाण्यासाठी जो रस्ता बनविला होता त्या रस्त्याला पावसाने भोगदा बनविला आणि त्या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला त्या गावातील नागरिकांवर उपास मारीची पाळी आली आहे
त्या गावात एकादी गर्भवती महिला जर असेल तर दावण्याची ऍम्ब्युलन्स अजिबात जात नाही व त्या महिलेच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट नाकारता येणार नाही पावसाच्या पुराणे पूर्ण रस्ताच वाहून गेल्या मुळे त्या गावातील नागरिकांना आपल्या उपजीविकासाठी फार तारेवरची कसरत करावी लागत आहे
त्या समधीत कंत्राटदार शासणे कारवाही करावी अशी मागनि त्या गावातील नागरिकांनी केली आहे त्या कंत्राटदराने जे छोटे कळवट बनविले ते आती निकृष्ट दर्जाचे बनविले होते म्हणून ते पावसाने वाहून गेले असे त्या नागरिकांचे म्हणणे आहे व गावातील संपूर्ण नागरिक आपला त्या कंत्राटदारावर राग वक्त करून त्यांचेवर शासनाने सक्त कार्यवाही करावी अशी शासनाकडे मागणी केली
कारवाही न केल्यास बांधकाम वर मोर्चा काढण्यात येईल असे मत वक्त केले त्या वेळी त्या गावचे जेष्ठ नागरिक माजी सरपंच लिंगाजी उसेंडी,अमित उसेंडी, ऋषीं उसेंडी, दानसू उसेंडी, सोनुजी उसेंडी, मानसू उसेंडी, तुकाराम दुगा, राजीराम उसेंडी, वसंताबाई उसेंडी, शशिकला उसेंडी, लक्ष्मीबाई उसेंडी, लिंबुनाबाई किरंगे, कमलाबाई उसेंडी, सायत्राबाई दुगा हे उपस्थित होते

Discussion about this post