दैनिक सारथी महाराष्ट्राचा (३/९/२०२४)
भुसावळ (जळगांव) : आयुध निर्माणी वरणगांव येथील ज्युनिअर क्लब येथे नुकताच २५ ऑगस्ट रोजी राजपूत समाज उन्नती मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जळगांव जिल्हा शिवसेना प्रमुख समाधान महाजन सर तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा.डॉ.विश्वजित शिसोदिया ( इतिहास अभ्यासक,जामनेर), संग्रामसिंग पाटील (व्हा.चेअरमन,शेतकी संघ भुसावळ), उत्तमसिंग पाटील (सेवानिवृत्त पी एस आय) आदींचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नेपाळ येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वरणगांव परिसरातील नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यानंतर महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात झाली. यावेळी इयत्ता पहिली ते पदवी मध्ये विशेष प्राविण्य, सेवानिवृत्ती सत्कार, सभासदांचे पदोन्नती बद्दल सत्कार आदी पात्र गुणवंतांचा सन्मानपत्र व महापुरुषांच्या जीवनावर आधारित ग्रंथ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते प्रा.डॉ.विश्वजित शिसोदिया यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला व त्यांचे जीवनकार्य हे समाजासाठी उत्तम प्रेरणास्थान आहे, असे नमूद केले. त्याचबरोबर प्रा.डॉ.विश्वजित शिसोदिया यांनी समाज संघटनेचे महत्व सांगून विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम शिक्षण घेऊन स्पर्धात्मक युगाकडे वाटचाल करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
अध्यक्षीय भाषणात समाधान महाजन सर (जळगांव जिल्हा शिवसेना प्रमुख) यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्व विषद करून समाज संघटीत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उपस्थितांना आवाहन केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष गोकुळसिंग बलावणे तर सूत्रसंचालन सत्यपालसिंग राजपूत व आभारप्रदर्शन एस सी पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रवीण पाटील, सी एल पाटील, बाबुलाल पाटील, पंकज जाधव, स्वप्नील राजपूत, चंचलसिंग राजपूत आदि समाजबांधवांनी परीश्रम घेतले.
बातमीचा स्त्रोत : गोपाळ कळसकर , दैनिक सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी , भुसावळ जिल्हा जळगांव (मी स्वत: उपस्थित होतो) मोबाईल क्रमांक . ९४२०२४३५७७
Discussion about this post