आयुध निर्माणी वरणगांवची विक्रमी उत्पादनाकडे वाटचाल, आयडीइयु युनियनकडून निर्माणी कर्मचा-यांचे अभिनंदन
दैनिक सारथी महाराष्ट्राचा (३/९/२०२४)
भुसावळ (जळगांव) : आयुध निर्माणी वरणगांव ही संरक्षण क्षेत्रातील नामवंत शस्त्रास्त्र( दारुगोळा) उत्पादन कंपनी आहे. ऑगस्ट महिना पूर्ण होण्याच्या आतच 300रु. कोटींचे उत्पादन आयुध निर्माणी कर्मचा-यांनी पूर्ण केले. आयुध निर्माणी वरणगांवच्या इतिहासातील ही अभूतपूर्व घटना आहे. अत्यंत अल्प कालावधीत खर्चात बचत करत हे लक्ष्य साध्य झाल्याने आणि निर्माणी कर्मचा-यांच्याही उत्पन्नात वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण सध्या दिसून येत आहे.
निर्माणी प्रशासनाने केलेले कामकाजाच्या तासांचे नियोजन आणि कर्मचा-यांनी त्यांना दिलेली साथ यामुळेच हे साध्य होऊ शकले, असे प्रतिपादन इन्डिपेन्डेन्ट डिफेन्स एम्प्लॉइज युनियनचे ( IDEU) अध्यक्ष श्री. रमाकांत पवार यांनी केले. यानिमित्त निर्माणीचे मुख्य महाप्रबंधक राकेश ओझा सर आणि उत्पादन विभागाचा कार्यभार पाहणारे संयुक्त महाप्रबंधक महेश शिंदे सर यांचा IDEU चे महासचिव श्री. अजय इंगळे यांनी यानिमित्त पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. भारतीय सशस्त्र दले लघु शस्रांसाठी पूर्णता: आयुध निर्माण्यांवरच अवलंबून असून वरणगाव निर्माणीचे त्यामुळेच देशाच्या सुरक्षेमध्ये महत्वाचे योगदान आहे. सध्याचे आर्थिक वर्ष संपण्याच्या आतच यापेक्षाही मोठा विक्रम प्रस्थापित करण्याचा निर्धार निर्माणी कर्मचाऱ्यांनी केला असल्याची माहिती एन.पी.डी.इ.एफ चे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आणि कार्यसमिती सदस्य सत्यपालसिंग राजपूत यांनी दिली.
यावेळी जे.सी.एम.सदस्य अजय पाटील, जे. सी. एम. सदस्य गिरीश खुशलानी, उपाध्यक्ष प्रसेनजित कोंगे, सहसचिव सचिन झोपे, कार्यसमिती सदस्य श्री. किरण पाटील, क्रेडिट सोसायटी संचालक श्री. निलेश भोळे उपस्थित होते.
बातमीचा स्त्रोत : गोपाळ कळसकर , दैनिक सारथी महाराष्ट्राचा प्रतिनिधी , भुसावळ जिल्हा जळगांव (मी स्वत: उपस्थित होतो) मोबाईल क्रमांक . ९४२०२४३५७७
टीप : बातमीसोबत फोटो संलग्न आहे.
Discussion about this post