बेडग – नागरगोजेवाडी रस्ता दुर्लक्षित
रस्ता न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालणार
बेडग : सारथी महाराष्ट्राचा
बेडग (ता. मिरज) येथील
नागरगोजेवाडी रस्ता हा ५ कि.मी.
अंतराचा असून तो पुढे वड्डी गावाला
जोडला आहे. परंतु मागील ११
वर्षांपासून दुर्लक्षित आहे. तत्पूर्वी हा
रस्ता डांबरीकरण करण्यात आला
होता. त्यानंतर त्याची एकवेळाही
दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
बेडगमधील ७५ टक्के लोक हे वाडी-
वस्तीवर राहतात. या मार्गावर
जवळपास ४ ते ५ हजार लोकसंख्या
असून त्यांना याच खड्डयांतून प्रवास
करावा लागतो आहे.
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा
बायपास रस्ता हा तासगाव – म्हैसाळ
येथून जाणार असल्याने बेडग-
नागरगोजेवाडी रस्ता या महामार्गावर
जाण्यासाठी जवळचा मार्ग ठरणार
आहे. हा रस्ता नव्याने करण्याची
मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे
बेडग : बेडग – नागरगोजेवाडी रस्ता असा खड्डेमय झाला असून यातूनच मार्ग
काढत प्रवास करावा लागतो आहे.
” अनेक वर्षांपासून मागणी असून बांधकाम विभागाकडुन ४ टप्प्यात
निधी मंजूर असल्याचे सांगितले जात आहे परंतु, प्रत्यक्ष कामास सुरुवात नाही. शेवटचा टप्पा पूर्ण होईपर्यंत पहिला टप्पा खराब होईल.
त्यामुळे मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान सडक योजनेतून रस्ता व्हावा अशी मागणी – नागरगोजेवाडी ग्रामस्थ करत आहेत. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल. असा ठोस निर्णय ग्रामस्थांनी घेतलेला आहे
आमदार सुरेश खाडे यांनी यावर
तीन ते चार टप्प्यात निधी मंजूर केला
असल्याचे मागील निवडणुकीपासून
सांगितले जाते, परंतु प्रत्यक्षात रस्ता
मात्र होत नसल्याचे स्थानिक
नागरिकांचे म्हणणे आहे. चांगला रस्ता
होता तेव्हा नागरगोजेवाडी बसही सुरू
होती. परंतु तीही बंद करण्यात आली.
बससेवा पूर्ववत व्हावी अशी कॉलेज तरुणांची मागणी आहे..
Discussion about this post