अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना तात्काळ मदत द्यावी प्रा डॉ पुरुषोत्तम केशवराव धोंडगे
प्रतिनिधी लोहा (पठाण सोहेल)
कंधार व लोहा या दोन्ही तालुक्यात अतिवृष्टी होवून सोयाबीन, हळद, ज्वारी, कापुस, उडीद, तुर या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतक-यांना यावर्षीचा पिकविमा मिळण्यासाठी शेतक-यांनी 72 तासाच्या आत क्लेम करावा अशी शेतक-यांना घातलेली जाचक अट रद्द करून शासनाच्यावतीने सरसकट पंचनामे करून कंधार व लोहा या दोन्हीही तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा व शेतक-यांना नुकसान भरपाई देवून हवालदिल झालेल्या शेतक-यांना आधार देवून साह्य करावे.
तसेच शेतक-यांच्या 2023 या वर्षातील पिकांची आनेवारी 50% च्या आत येवूनही अद्यापपर्यंत
शेतक-यांना 2023 चा पिकविमा मिळाला नाही. नांदेड जिल्ह्यातील कंधार व लोहा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांना पिकविमा मिळाला असून फक्त कंधार व लोहा तालुक्यातील शेतक-यावर पिकविमा मिळाला नसल्यामुळे अन्याय झालेला आहे. त्यांना पिकविमा मिळणे आवश्यक आहे.
सततच्या निसर्गाच्या लहरीपणामुळे, नापिकीमुळे शेतकरी पुर्णपणे हताश झाला आहे. कर्जबाजारी झालेल्या अनेक शेतक-यांच्या महाराष्ट्रात अत्महत्या झाल्या आहेत. शासनाने 2023 च्या पिकविम्यासह यावर्षीची यावर्षीचा पिकविमा व नुकसान भरपाई त्वरीत देवून शेतक-यांचा सातबारा कोरा केला तर शेतक-यांना आधार मिळणार आहे.
तरी कृपया वरील सर्व बाबींचा विचार करून त्वरीत शेतक-यांना न्याय द्यावा अन्यथा कंधार व लोहा तालुक्यामध्ये शेतक-यांच्या न्यायासाठी सत्याग्रह करावा लागेल. याची नोंद घेवून साह्य करावे, ही विनंती. असे निवेदन आज प्रा.डॉ. पुरुषोत्तम केशवराव धोंडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. यावेळी उपस्थित
बाबाराव पाटील शिंदे,भीमराव वंजे,पंडितराव पेठकर,माधवराव भालेराव,उद्धव पाटील लाडेकर,सरपंच आत्माराम पाटील लाडेकर, राजीव पाटील डफडे, विठ्ठल डफडे,आकाश डफडे,माधव लुंगारे,राजीव लुंगारे शिवाजी पाटील भुत्ते, हनुमंत आनकाडे,शामराव गायकवाड,विलास सांगवे,विठ्ठल भुत्ते,कंटीराम पाटील कदम,राजू तोरणे, ऋषिकेश तोरणे,विकास गायकवाड.
Discussion about this post