जय गणेश !
आज लातूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने गणेशोत्सव उत्सव २०२४ निमित्त शांतता समिती बैठक उदगीर बैठक संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सोमय मुंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मा.सोहेल शेख, उदगीर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुंदर बोंदर, उदयगिरी गणेश महामंडळ चे कार्यकारी अध्यक्ष श्री गुलाबराव पटवारी इत्यादी मान्यवरांचे उपस्थिती बैठक संपन्न झाली.
यावेळी उदगीर शहरातील समृद्ध परंपरा असलेला गणेशोत्सव दि. १९ सप्टेंबर २३ ते २५ सप्टेंबर २०२३ या काळात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला, हा गणेशोत्सव साजरा करताना समाजिक, धार्मिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जपण्यास, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट चे योगदान लक्ष्यात घेवून, उदगीर श्री गणेशोत्सव 2023 यांच्या कडून द्वितीय क्रमांकाचे स्मृतीमूर्ती चिन्ह व प्रमाणपत्र देऊन श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ ट्रस्ट,उदगीर ला गौरविण्यात आले. याबद्दल उदगीर गणेश महामंडळचे,आम्ही आभारी आहोत.
पारितोषिक स्वीकारत असताना, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ चे अध्यक्ष आशिष अंबरखाने, उपाध्यक्ष विजय निटूरे, कोषाध्यक्ष कैलास मोदी, सदस्य केदार पेन्सलवार, सदस्य अमीत पसारे, सदस्य कपिल शेटकार इत्यादी मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते..
Discussion about this post