सि. ना. आलुरे गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी वादविवाद स्पर्धा
माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथील जवाहर महाविद्यालयात शुक्रवारी (दि. ६) राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त महाविद्यालयीन संघांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य डॉ उमाकांत चनशेट्टी यांनी केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी तारक की संहारक हा विषय आहे.
प्रथम सांघिक बक्षीस रोख रकम ३१ हजार, द्वितीय बक्षीस २१ हजार, तृतीय सांघिक बक्षीस १५ हजार प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह तर उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून ७५०० रुपये प्रमाणपत्र असे आहे. वैयक्तिक पारितोषिक प्रभावी वक्ता (दोन) प्रत्येकी ५ हजार रु प्रमाणपत्र, तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची व भोजनाची महाविद्यालयाच्या वतीने मोफत करण्यात आली आहे. जास्तीत जास्त महाविद्यालयांनी स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन
प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, उपप्राचार्य डॉ. मल्लिनाथ लंगडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आयोजन समितीचे डॉ. अनिता मुदकन्ना, डॉ. मल्लिनाथ बिराजदार, डॉ. राजशेखर नळगे, डॉ. सूर्यकांत आगलावे, डॉ. सुनील राजपूत, डॉ. मीना जाधव, डॉ. सत्येंद्र राऊत, डॉ. दयानंद कांबळे, डॉ. विवेकानंद वाहुळे, डॉ. वीरभद्रेश्वर स्वामी, डॉ. प्रसन्न कंदले यांच्याशी संपर्क साधावा.
प्रतिनिधी : संतोष पवार
Discussion about this post