नळदुर्ग :- लहानपणी वडीलांचे छत्र हरवले,आईने मोलमजुरी करत दहावीपर्यंतचे शिक्षण पुर्ण केले आणि आईसुद्धा नियतीने हिरावली,अनाथ झालेल्या भुम तालुक्यातील माणकेश्वर येथील बालक शुभम हौसेराव बनगर याच्यावर मामा,मामी आणि आजीने लक्ष दिले,पण त्यांचीही आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने धाराशिव येथील बालगृहात प्रवेश मिळावा यासाठी मामांनी बालकल्याण समितीमध्ये येवुन अर्ज केला होता
,काळजी आणि संरक्षणाची गरज असल्याने बालक म्हणून बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी बालक शुभम बनगर यास बालगृहात प्रवेश दिला
शुभम जिद्दीने, चिकाटीने अभ्यास केला,आई वडीलांचे त्याला स्वप्न साकार करायचे होते, वडीलांच्या निधनानंतर आई आणि त्याला होणारा त्रास त्यांनी सहन केला होता, अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आपण पोलीस दलात दाखल व्हायचे असे ठरविले
जिद्द व चिकाटीने अभ्यास करुन इयत्ता बारावी पास होऊन मैदानावर भरतीसाठी प्रयत्न करीत होता, वेळोवेळी बालकल्याण समिती व निरीक्षणगृह/ बालगृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सहकार्य व मदत केली
आणि शेवटी दिनांक ३ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र पोलीस ठाणे येथे अनाथ असलेला शुभम बनगर हा पोलीस दलात भरती झाला आहे,याचा आनंद बालकल्याण समिती व बालगृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांना झाल्याने शुभम बनगर यांचा यथोचित सत्कार करण्यात आला
यावेळी बालकल्याण समितीचे अध्यक्ष विजयकुमार माने, बालकल्याण समितीचे सदस्य दयानंद काळुंके, ॲड दिपाली जहागिरदार, ॲड सुजाता माळी,निरीक्षण गृहातील राजेंद्र जाधव, ओमप्रकाश निपाणीकर, प्रशांत मते, महेश मेंढेकर,मनिष आदमाने यांच्यासह कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रतिनिधी : संतोष पवार
Discussion about this post