नाशिक जिल्हा प्रतिनिधी:-
५ सप्टेंबर या दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो, शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेंबर रोजी पि एम जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा पळसन शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिक्षक दिनी कल्याणी चौधरी ही मुख्याध्यापिका बनली व तिच्या नियोजनाने सर्वांचे लक्ष वेधले. विद्यार्थ्यांनी शिक्षक दिवस हा मोठ्या उत्साहात साजरा केला.
शिक्षक दिन या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली. व कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडला.दुपारच्या सुट्टीनंतर विद्यालयाच्या सभागृहांमध्ये शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींनी गायलेल्या स्वागत गीताने झाली. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष इतर शिक्षकांना शाल आणि श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
शिक्षक दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक अनंता बिरारी, संजय गवळी, रामजी मोवळे, दिपक साबळे, जिवला गावित, विठ्ठल पाडवी, विठ्ठल चौधरी, सुमित्रा गायकवाड, सारदा खुरकुटे, आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे. उपशिक्षणाधिकारी धनंजय कोळी,समवेत,यांनी शिक्षकाचे महत्त्व समाजात असलेली शिक्षकाची गरज या विषयी भाषणे दिली.
शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे कार्यक्रमांमध्ये भाषण स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध वर्गातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपापले भाषणे सादर केली. भाषण स्पर्धेनंतर विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सन्मान करिता त्यांना पुष्पगुच्छ दिले आणि त्यांचे आभार मानले आणि सर्वात शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन घेण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
Discussion about this post