– श्री भाग्यदेव घुले.
हवेली तालुका प्रतिनिधी
गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली असून लवकरच घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
आपल्या परिसरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळे, बैठी घरे आणि सोसायटी मधील नागरिक मोठ्या संख्येने या घाटांवर गणपती विसर्जन करावयास येत असतात आणि याकाळात कोणत्याही प्रकारचे अपघात होऊ नये म्हणून त्या दृष्टीने नागरिकांच्या सुरक्षिततेच्या आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे.
बोपखेल उपनगरांमध्ये परिसरातील विसर्जन घाटावर विसर्जनासाठी येणार्या गणेश भक्तांसाठी विसर्जन घाट गणपती आरती करण्याची व्यवस्था करणे, घाटावर सुरक्षिततेच्या दृष्टीने निगराणी ठेवण्यासाठी CCTV कॅमेरे बसविणे, घाटांवर आवश्यक अशी विद्युत दिवे लावणे, गणेश मूर्ती विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कुत्रीम हौद बनवने व स्वच्छता च्या दुष्टीने नीटनेटके करणे अत्यावश्यक सेवेसाठी २४ तास एक रुग्णवाहिका उपलब्ध करणे, विसर्जन घाटांवर नियमितपणे एक बचाव पथक नियुक्त करणे जेणेकरून विसर्जन दरम्यान होणारे जीवघेणे अपघात टाळता येतील.
तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती लाईटची कामे व रस्त्यातील खड्डे असे सर्व उपाययोजना करण्या बाबत आज इ- प्रभाग अधिकारी राजेश आगळे सरांनला भेटुन सांगण्यात आले आहे त्या वेळी शिवसेना शाखाप्रमुख संतोष गायकवाड , रोहिदास जोशी उपस्थित होते.
Discussion about this post