गणिताची आकडेमोड करताना आयुष्याची बेरीज-वजाबाकी शिकवतो, इतिहासाची ओळख करुन देताना शौर्य आणि धैर्य शिकवतो, भूगोलात राहून आकाशात उंच झेप घ्यायला शिकवतो, भाषेचं ज्ञान देताना मातृभूमीचं महत्त्व शिकवतो, जीवनात वाट दाखवणारा प्रत्येकजण आपला शिक्षक असतो!
आज शिक्षक दिन
ज्यांनी मला घडवलं,
या जीवनात मला जगायला शिकवलं, लढायला शिकवलं,
अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे.
माझ्यासाठी मला आमच्या कॉलेजचे सर संजय नायकवडी सर, डॉक्टर जी एन ठोकर सर , डॉक्टर एस एन तेली सर ,वेदपाठक मॅडम ,कुंभार मॅडम , बाविस्कर सर , डॉक्टर आलम शेख सर, डॉक्टर प्रशांत इंगळे सर, एम बी सोरटे सर, जोशी सर आणि सुनील पाटील सर या व्यक्ती माझ्यासाठी गुरु आहे. त्यांनी मला वेळोवेळी मदत केली. माझ्याकडून काही चूक झाली तर ते मला समजावून सांगत असे म्हणून मला त्यांच्याबद्दल अभिमान आहे. त्यांच्याकडून मला बरेच काही शिकण्यास मदत मिळाली मी त्यांना शिक्षक दिनानिमित्त त्यांना गुरु मानतो अशीच मला त्यांच्याकडून वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले जाते त्यांच्याबद्दल मी स्वतःहून त्यांचं आभार मानतो .
मी प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकत असतो..
अशा आपल्या सारख्या थोर व्यक्तींना माझ्या हृदयापासून धन्यवाद…!
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! अशोक वाघमारे , उमेश चव्हाण, अशोक सारंग, राजू यादव ,सागर यादव
सरस्वती अभियांत्रिकी महाविद्यालय खारघर नवी मुंबई
Discussion about this post