
निलंगा/प्रतिनिधी तेलंगे सिद्धेश्वर

मंत्रीपदासाठी मी त्यांचा वकील-चंद्रशेखर बावनकुळे
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी बारा दिवसाची तीनशे किलोमीटरची पायी जनसमान पदयात्रा काढली होती.त्या पदयात्रेचा समारोप निलंगा येथे करण्यात आला.भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.संभाजीराव पाटील निलंगेकर हे राज्यातील टॉप-१० आमदारांपैकी एक आहेत. आमदार असावा तर संभाजी भैय्यासारखा, त्यांना निलंगा विधानसभा मतदार संघातून एक लाखाच्या मताधिक्क्याने निवडून द्या. मंत्रीमंडळात पहिल्या १० मध्ये त्यांचा समावेश करण्यासाठी मी त्यांची वकिली करेन, असे आवाहन व विनंती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
आपल्या मतदार संघाच्या, मराठवाड्याच्या विकासासाठी मंत्रालयाचे सातही मजल्यावर विधानभवनात पायपीट करणारे एक आदर्श आमदार आहेत. पक्षाने ना. नितीन गडकरी, ना. देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यानंतर संभाजीरावांच्या ‘पदयात्रा’ समारोपास मी आलो. त्यांना किमान एक लाखाच्या मताधिक्क्याने विजयी करणार असे त्यांनी उपस्थित भगिनी, भावांकडून वदवून घेतले.
आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या मतदार संघात १०० गावातून ३०० कि.मी. ची जनसन्मान यात्रा काढल्यानंतर काल निलंगा येथे
बाभळगावची माणसं आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात बाभळगावची माणसांना ईशारा दिला, तुम्ही मला पराभूत करण्यासाठी किती पैसे खर्च करा त्याचा परिणाम होणार नाही. निलंगा हा स्वाभिमानी लोकांचा मतदार संघ आहे. आम्हाला खेटायला येण्याची हिम्मत करू नका असा ईशाराच आपल्या भाषणातून दिला.
जनसन्मान पदयात्रेच्या कार्यक्रमात केली. समारोप बसवकल्याणचे आ. शरणू सलगर यांनी संभाजीराव पाटील माझा भाऊ आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मी या मतदार संघात ४० दिवस मुक्काम करणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षांनी मला कार्यक्रम द्यावा, अशी विनंती या सभेत माजी खा. रूपाताई पाटील निलंगेकर यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी आ. गोविंद केंद्रे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप देशमुख, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, शिवाजीराव पाटील कव्हेकर, लातूर शहर जिल्हाध्यक्ष
देवीदास काळे, राहुल केंद्रे, गणेशदादा हाके, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगडे, मनोज कोळे,वीरभद्र स्वामी, भारतीय जनता पार्टीचे निलंगा, देवणी,शिरुर अनंतपाळ,तिन्ही तालुकाध्यक्ष,बाजार समितीचे सभापती राजकुमार चींचंनसुरे, तम्मा माडीबोने,दत्ता मोहोळकार, अर्जून पौल,संगायो अध्यक्ष शेषेराव ममाळे, स्थानिकचे पदाधिकारी विशेष करून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. काल समारोपाच्या १२ व्या दिवशी ही पदयात्रा निलंगा शहरात आली तेंव्हा त्या यात्रेचे निलंगेकर यांनी भव्य स्वागत केले.
Discussion about this post