साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचा चिठ्याद्वारे काढलेला लकी ड्रॉ संशयास्पद….. प्रस्ताव दाखल केलेल्या लाभार्थ्यांत तीव्र नाराजगी
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमांतून सन-2023-24 या वर्षी एनएसएफडीसी अंतर्गत राबविण्यात आलेल्या महिला समृद्धी योजना, महिला सुविधा कर्ज योजना, पुरुष सुविधा कर्ज योजना, अपंग पुरुष सुविधा कर्ज योजना आदीं सर्व योजनांसाठी देण्यांत आलेली उद्दिष्टे व संबंधित योजनेसाठी कर्ज प्रस्ताव दाखल केलेले लाभार्थी संख्या यांतील संख्या व फरक लक्षांत घेता पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी दाखविण्यात आली मात्र यांमध्ये लकी ड्रॉ काढण्याचा निर्णय घेण्यांत आला.
ठरल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर येथे 05 सप्टेंबर व जालना येथे 06 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली लकी ड्रॉ काढण्यात आला… यांत Randomly चिठ्याद्वारे व नंतर लकी ड्रॉ चिठ्याद्वारे लाभार्थ्यांची दिशाभूल करण्यांत आली व या लकी ड्रॉ मध्ये एका-एका लाभार्थ्यांच्या दोन-दोन चिठ्या निघाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
म्हणून यांत मा.जिल्हाधिकारी आणि महामंडळाचे अधिकारी यांच्या संगनमताने काही खिचडी शिजली जात असल्याचा दाट संशय लाभार्थ्यांनी “अजंता एक्स्प्रेस न्यूज” सोबत बोलतांना व्यक्त केला. व ज्या लकी ड्रॉ साठी तुम्ही पूर्णवेळ दिवस निवडला असतांना देखील सर्व पात्र लाभार्थ्यांची नावे न वाचता दोन तासांतच कार्यक्रम आटोपण्याचा अट्टहास का.?? असा प्रश्न निर्माण होत आहे. व आम्हीं दरवेळी आमचा प्रस्ताव दाखल करुन देखील महामंडळाला शिव्या देणाऱ्या लोकांचीच नावे लकी ड्रॉ मध्ये का येतात असा सवाल उपेक्षितांनी केला आहे. या गंभीर विषयांतून पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठे महामंडळ चर्चेत येण्याची दाट शक्यता आहे…!!
Discussion about this post