प्रतिनिधी –
याबाबत सविस्तर वृत्त असे की , एरंडोल येथे एकूण १८ नोंदणीकृत गणेश मंडळ असून त्यांनी सकाळी आठ वाजेपासून ते रात्री आठ वाजेपर्यंत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढून श्री गणेशाची मूर्तीची स्थापन केली.
यावेळी अनेक मंडळांनी ट्रॅक्टरवर भव्य आरास व देखावे सुद्धा उभे केले असल्याने लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दगडूशेठ देवरे मानाचा गणपती प्रति पद्मालय म्हणून ओळखल्या जाणार्या मंडळातर्फे शिव तांडव ढोल पथक यांनी आपल्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
सकाळपासून अनेक बाल गोपाल हे आपल्या घरी गणपती स्थापना करिता गणपती घेण्यासाठी मेन रोडवर गर्दी करून होते. प्रत्येक कॉलनीवाशीयांनी सुद्धा आपाल्या कॉलनीत गणपतीची स्थापना करून आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी एरंडोल पो. स्टे.चे पो. नि. सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
Discussion about this post