मग थांबा आधी ही बातमी वाचाच
भारतातील कोणत्याही शहरात हॉटेलमध्ये रूम बूकिंगसाठी गेल्यावर आपल्याकडे आधार कार्डची मागणी करण्यात येते.
चेक इनच्या वेळी आधार कार्ड मागितले जाते.
अशा वेळी जवळपास ९९ % टक्के नागरिक हे आपल्याकडी ओरिजनल आधार कार्ड हॉटेल चालकाकडे देतात. पण या एका चुकीमुळे मोठी समस्या निर्माण होऊ शकते.
आधार कार्डद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते इतकेच नाही तर तुम्हाला आर्थिक गंडा सुद्धा घातला जाऊ शकतो.
अशा परिस्थितीत नेमके काय करावे?
जाणून घ्या…
🔸मास्क आधार कार्ड
आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक टाळायची असेल तर तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल.
हे म्हणजे ओरिजनल आधार कार्ड देण्याच्या ऐवजी त्याची मास्क आधार कार्ड वापरा. हॉटेलमध्ये रूम बूक करण्यासाठी गेल्यावर आधार कार्डची मागणी केल्यावर मास्क आधार कार्ड द्या. मास्क आधार कार्ड म्हणजे काय ?
आणि हे कसे बनवले जाते ?
असे प्रश्न आता तुमच्या मनात आले असतील तर काळजी करू नका.
आम्ही तुम्हाला याबाबत सांगणार आहोत.
सध्याच्या काळात आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे. आधार कार्ड हे आपल्य बँक अकाऊंटसोबत जोडलेले असते. त्यामुळे कोणत्याही प्रकारची फसवणूक आणि घोटाळ्याला बळी पडू नये यासाठी काळजीपूर्वक आधार कार्डचा वापर करावा.
त्यासाठी मास्क आधार कार्डचा वापर करा.
मास्क आधार कार्ड हे तुम्हाला सुरक्षित बनवते.
ओरिजनल आधार कार्डवर आपल्या आधार कार्डचा संपूर्ण नंबर असतो. पण मास्क आधार कार्डवर केवळ शेवटचे ४ अंक असतात. आधार नंबर पूर्ण नसल्याने फसवणूक होण्याचा धोका टळतो आणि आपले आधार कार्ड सुरक्षित होते.
🔸मास्क आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे?
सर्वप्रथम UIDAI च्या https://uidai.gov.in/ याअधिकृत वेबसाईटला भेट द्या.
त्यानंतर My Aadhaar टॅबवर क्लिक करा.
मग तुम्हाला आपला आधार क्रमांक भरून कॅप्चा टाकावा लागेल.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर ओ.टी.पी. पाठवला जाईल.
ओ.टी.पी. टाईप केल्यावर तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल.
मग तुम्हाला एक चेक बॉक्स येईल त्यामध्ये विचारलेले असेल की तुम्हाला मास्क आधार कार्ड हवे आहे का?
हवे असल्यास यावर क्लिक करा.
यानंतर तुम्ही आपले मास्क आधार कार्ड डाऊनलोड करु शकता.
मास्क आधार कार्ड हे तुम्ही प्रवासाच्या दरम्यान वापरू शकता.
तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये रूम बूकिंग करताना किंवा चेक आऊट करताना व्हेरिफिकेशनसाठी याचा वापर करु शकता.
इतसेच नाही तर एअरपोर्टवर सुद्धा मास्क आधार कार्ड वापरू शकता.
Discussion about this post