दि. १० सप्टेंबर.
गगनबावडा प्रतिनिधी :- नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत करवीर मतदारसंघातून बहुमताने निवडून आलेले कोल्हापुरचे नुतन खासदार श्री.छत्रपती शाहू महाराज यांचा संपर्क आणि आभार दौरा आज पार पडला.
डॉ. पद्मश्री डी.वाय.पाटील सह.साखर कारखाना येथे त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
विद्यार्थी, विद्यार्थींनींचा स्पर्धा परीक्षांच्याकडे कल वाढावा म्हणूनविविध क्षेत्रातील स्पर्धा परिक्षामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज यांनी माननीय. आमदार श्री.सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासोबत मविआ पक्षाचे आणि मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले, तसेच गगनबावडा तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांचेही त्यांनी आभार मानले.
तालुक्यातील सर्व गावातील सरपंच,उपसरपंच. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नुतन खासदार श्री. छत्रपती शाहू महाराज यांचा सत्कार केला.
यावेळी माननीय आ.सतेज उर्फ बंटी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मा. व्ही.पी.पाटील,मा.राहुल पी.एन.पाटील, गोकुळ संघाचे संचालक चेतन नरके, शिवसेना नेते मा.विजय देवणे, डॉ. पद्मश्री.डी.वाय.पाटील साखर कारखान्याचे सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी आणि गगनबावडा तालुक्यातील सर्व गावचे सरपंच आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Discussion about this post