कुसूर ता: दक्षिण सोलापूर
गावात कॅनल वस्ती या ठिकाणी मोठ्या दिमाखात गणरायाचे आगमन…!
गेल्या काही महिने ज्या गणरायाच्या आगमनाची आतुरता भक्तामध्ये असते, त्या गणरायाच्या स्वागतासाठी कॅनॉल वस्तीने ने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन करुन आगमनाची तयारी केली आहे
यासाठी सजविलेल्या वाहनातून बाप्पा ची मिरवणुक, बँजो च्या तालावर भव्य आणि दिव्य मिरवणूक व जल्लोषात गणरायाचे स्वागत करण्यात आले, या मिरवणुक मध्ये मोठ्याप्रमाणात कॅनॉल वस्तीचे नागरिक सहभागी झाले.
काल वार सोमवार संध्याकाळची गणरायाची पूजा दक्षिण सोलापूरचे युवा नेते व विंचूर गावचे सरपंच बाळासाहेब पाटील व महासिद्ध निंगप्पा बिराजदार यांच्या हस्ते संपन्न झाला. पूजेनंतर सरपंच बाळासाहेब पाटलांचा मंडळातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
थोडक्यात कॅनल वस्तीचे यंदा दुसरे वर्ष आहे तरीही इथल्या युवकांनी चांगल्या पद्धतीने मनोभावे रोज नवनवीन स्पर्धा घेत आहे. कालची स्पर्धा स्लो मोटरसायकल स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन प्रगतशील शेतकरी महासिद्ध बिराजदार यांच्या हस्ते झाले.
सिद्धिविनायक कॅनॉल वस्ती हे कुसूर पासून तीन किलोमीटर अंतरावर तर विंचूर पासून तीन किलोमीटर अंतरावर व वडापूर पासून तीन किलोमीटर अंतरावर सीमा वरती भागामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. कॅनल वस्तूचे सर्व नागरिक मनोभावे रोज गणरायांच्या पूजेमध्ये सहभागी होतात व पूजा करतात.
विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होतात या मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाचे उपाध्यक्ष हे मुस्लिम समाजाचे आहे.
या वर्षीचे सन्माननीय अध्यक्ष मा. गेनसिद्ध पुजारी तर उपाध्यक्ष मा. बाबाशा शेख सचिव उमेश सिद्धापुरे सहसचिव मल्लिकार्जुन नरोटे कार्याध्यक्ष अजित मेडेदार व शुभम भद्रगोंडे खजिनदार महांतेश निंगाणे, मिरवणूक प्रमुख कुमार हक्के, संजय भद्रगोंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, महेश बिराजदार, रमेश बिराजदार, राजकुमार सिद्धाराम होनमाने, संतोष निंगाणे.. महासिद्ध बिराजदार महासिध्द लोणी , बसराज कोष्टी, परमेश्वर नरोटे व इतर पदाधिकारी शिवानंद बगले, राजकुमार भुयारे, सिद्राम भुयारे, संतोष भुयारे शिवानंद बाळासो हेरकर दयानंद सासणे..गुंडू चौधरी, नागेंद्र नरोटे.. मंडळाचे आधारस्तंभ लोकपा रामा माशाळे, सिद्धाराम व्हनमाने, नानासाहेब निंगाणे, महासिद्ध निंगप्पा बिराजदार, गणपती हक्के, बाळासाहेब कोष्टी, बाळासाहेब व्हनमाने, राम मेडेदार पीरसाहेब शेख औदुसिध्द नरोटे यांच्या उस्थितीमध्ये मोठ्या दिमाखात व उत्साहात आगमन सोहळा पार पडला.
मंगलमूर्ती मोरया च्या जयघोषाने व आगमन सोहळ्यानी कॅनल वस्ती दुमदुमून गेले.
Discussion about this post