मुंजलवाडी प्रतिनिधी :- चंद्रकांत वैदकर
रावेर तालुक्यातील विवरे येथिल खिर्डी रोडवरील विवरे शेत शिवारात एका शेतातील पावरग्रिटच्या टावर वर चढून एका २५ वर्षिय इसमानी आत्महात्या केल्याची घटना विवरे गावा जवळ घडली. या घटनेमुळे गावात एकच खळबड उडाली.
विवरे खिर्डी रस्त्यावरील संतोष देवचंद तेली यांच्या शेतातुन गेलेल्या पावर ग्रिटच्या अत्तीउच्च विद्युत क्षमतेचा टावरवर सुमारे शंभर ते सव्वाशे फुट वरती चढून ब्रिजेश कुमार बायगा वय २५ रा, भरतपुर (छतीसगढ) या इस्माने कापडच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
गावात ही घटना वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे या ठिकाणी विवरे सह खिर्डी परिसरातील नागरीकांसह शेतकऱ्यांनी सकाळपासून एकच गर्दी केली. ब्रिजेश कुमार याची पँट व कोपी त्या ठिकाणी आढळून आली. त्याची पॅट मधुन पॅन कार्ड आढळून आल्याने त्यावरून पोलीस प्रशासनाने त्याचे नातेवाईकांशी संपर्क केला.
त्यावरून त्याची ओळख पटली. अंदाजे सुमारे शंभर ते दिडशे फुटउंच टावरवर चढुन आत्महत्या केल्याची ही राज्यातील पहिलीच घटना असल्याचा विषय घटनास्थळी चर्चेत होता ब्रिजेश याला पावर ग्रिटच्या अकोला पथकाच्या सहकार्यने खाली उतरविण्यात आले असुन रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
याबाबत निंभोरा पोलीस स्टेशनला आक्समात मुत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सपोनि हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शना खाली अविनाश पाटील, हे करीत आहे.
Discussion about this post