पुणे :-सामाजिक कार्यकर्ते सागर सोनकांबळे यांना राज्यसभेचे विद्यमान खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते विद्यार्थी सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
भीमशक्ती सामाजिक महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने विद्यार्थी सन्मान पुरस्कार अक्कलकोट तालुक्यातील किणी गावचे सुपुत्र * सागर सोनकांबळे यांना देण्यात आला.गेल्या अनेक वर्षापासून विविध सामजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे .
त्यात प्रामुख्याने किनी गावा मध्ये जे.एन सामजिक संस्था व सम्यक अल्पसंख्यांक संस्थेच्या माध्यमातून संविधान जनजागृती, पर्यावरण जनजागृती, महिला सक्षमीकरण, तरुणांसाठी गावामध्ये क्रीडा स्पर्धा भरविणे, शालेय साहित्य वाटप करणे , महापुरुषांच्या जयंती मध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे, असे अनेक समाज उपयोगी कार्य ग्रामीण भागात घेणे तसेच उत्तम अभ्यासक आणि मार्गदर्शक तसेच विद्यार्थी चळवळीमध्ये सक्रिय योगदान,
विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना विशेषता होतकरू मुलांना नेहमीच मदत, शैक्षणिक क्षेत्रातील विविध फेलोशिपसाठी संघर्ष करून विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळवून देण्यात मोलाचा वाटा, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात व्याख्यानाद्वारे प्रबोधन, महाराष्ट्र राज्यात खेडोपाड्यात जाऊन भारतीय संविधानाचे प्रचार आणि प्रसार करण्यात त्यांचं मौलिक योगदान राहिला आहे.* इत्यादी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नितु मांडके सभागृह स्वारगेट येथे. भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक, राज्यसभेचे विद्यमान खासदार, माजी सामाजिक न्याय मंत्री (महाराष्ट्र राज्य) चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थित त्यांना हा पुरस्कार. देण्यात आला.यावेळी माजी मंत्री खा.चंद्रकांत हांडोरे, मुख्य आयोजक प्रज्ञावंत गायकवाड, शहर कार्याध्यक्ष विजय हिंगे, उपाध्यक्ष विजय ओवाळ, शशिकांत बनसोडे, मिलिंद रणदिवे, विजय सुखदेव, अशोक भाऊ दिवे, रमेश भाऊ सुरवडे, मोहन माने यांच्यासह विविध क्षेत्रातील पुरस्कारार्थी, विविध संघटनाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते*.
Discussion about this post