6 Total Views , 1 views today
मुर्तिजापूर | प्रतिनिधी
श्रीसंत गाडगेबाबा यांच्या विचारांना प्रेरणास्थान मानणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे यांच्या वाढदिवसानिमित्त पशु-पक्ष्यांसाठी पाणी उपलब्ध करून देण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
पक्ष्यांसाठी ११ मातीच्या गंगोऱ्या, तर गुरांसाठी दोन पाण्याची टाकी
होळी आणि वाढदिवसाचे औचित्य साधून वीर संकट मोचन हनुमान मंदिर परिसरात झाडांवर पक्ष्यांसाठी ११ मातीच्या गंगोऱ्या तर गुरे-ढोरांसाठी दोन पाण्याची टाकी ठेवण्यात आली.
कार्यक्रमाचे मान्यवर आणि आयोजन
या सामाजिक उपक्रमाचे अध्यक्ष रवींद्र गवई होते. प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा स्मारक समिती अध्यक्ष राहुल तिडके, सामाजिक युवा कार्यकर्ते हर्षल साबळे, ग्रामपंचायत सदस्य गवई भाऊ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अरविंद तायडे, गुलाबराव म्हसाये, कलासृष्टी संस्थेचे अध्यक्ष कल्पक कांबळे, रमेश ढुके, श्याम हेंगळ आदी उपस्थित होते.

गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित उपक्रम
कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल डाहेलकर यांनी संस्थेच्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी उपस्थितांना अशा कार्यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यानंतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत सुरेश जोगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सामाजिक बांधिलकीचा संदेश
कार्यक्रमास वीर संकट मोचन हनुमान संस्थान, संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य तसेच गुणवंत नगर वाशी स्नेहीजन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाविष्कार बहुउद्देशीय संस्थेचे मिलिंद इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षय जोगळे यांनी मानले.
Discussion about this post