
परांडा: राज्य सरकारने सर्व जिल्ह्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान सुरू केले आहे.याच अभियानाच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या दिनांक १४ सप्टेंबर रोजी परंडा शहरात येणार आहेत.
पंचायत समिती परांडा जवळील कोटला मैदानावर सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील या सभेला उपस्थित राहणार आहेत.
या सभेस्थळी जाऊन धाराशिव चे जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी आढावा बैठक घेऊन पाहणी केली आणि विभाग प्रमुखांना कार्यक्रमाच्या जबाबदार्या सोपवल्या आहे.
Discussion about this post