आज खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिकची गणेशाची विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली.
मिरवणुकीत दिंडी पथक, टाळपथक ,लेझीम पथक, टिपरी नृत्य ,अशा पद्धतीने अतिशय सू नियोजित पद्धतीने सकाळी बाप्पाची मिरवणूक शाळेतून निघाली. मिरवणुकीचे खास वैशिष्ट्य म्हणजे शिक्षक बांधवांनी व शिक्षिका भगिनींनी सुद्धा मिरवणुकीत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या .अशीही आगळी- वेगळी मिरवणूक बघणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती . आज दिवसभर मिरवणुकीचीच चर्चा सर्वञ खिरविरे परिसरात होती .विद्यालयाचे कलाशिक्षक श्री कोते सर यांनी यमराजाची भूमिका साकारली . यमराजाने संदेश दिला की आपण व्यसनाधीन होऊ नका. कोणतेही व्यसन ही यमराजाकडे जाण्याची पायरी आहे.व्यसनापासून दूर राहवे. रोगांना आमंत्रण देऊ नका.
श्री मालुंजकर सर यांनी बाळूमामाची भूमिका साकारली. बरोबर शेळ्या बाळूमामांनी मिरवणुकीत आणल्या होत्या. या देखाव्यामुळे तर लोक साक्षात बाळूमामाचे मनोभावे दर्शन घेऊ लागले. श्री पांडे सर यांनी परशुरामाची भूमिका केली .श्री वाकचौरे सर यांनी तर यंदाही मिरवणुकीत वासुदेवाची भूमिका करून लोकांची मने जिंकून घेतली .श्री सौरभ मोहटे सर यांनी नंदीवाला भूमिका साकारली .हा नंदीवाला ढोलकीच्या तालावर नाचून भलताच प्रेक्षकांना भावला. इयत्ता आठवीची मोनिका सूर्यवंशी हिचे लावणी नृत्याने तर टाळ्यांचा पाऊस पडला. सकाळी सुरू झालेली श्रींच्या मिरवणुकीची दुपारी सांगता झाली.
आजच्या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते प्राध्यापिका श्रीमती भांगरे मॅडम यांचे वैदिनीचे पात्र बुरगुंडा होईल या त्यांच्या गाण्याने तर सगळ्यांची मनेच जिंकून घेतली. बुरगुंडा हे गाणे तर खिरविरे ग्रामस्थ विसरणे शक्यच नाही .सर्वांनी मॅडमचे खूप कौतुक केले. गणेश उत्सव विभाग प्रमुख श्री आंबरे सर व श्री कोते सर यांनी छान असे नियोजन केले होते .सर्वच शिक्षक बंधू भगिनींचे व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य मिरवणुकीत दिसून आले.
छान नियोजनाबद्दल गावकऱ्यांनी प्राचार्य श्री.मधुकर मोखरे सर यांचा गावाच्या वतीने फेटा बांधून सत्कार करण्यात आला. गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री .त्र्यंबकजी पराड यांनी दिलेल्या पाच हजार एक रुपयाची गणेशाच्या मूर्तीची शाळेत स्थापना केली होती. त्यांचाही शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचीच आज सर्वत्र खीरविरे परिसरात चर्चा होती. अतिशय जोशपूर्ण वातावरणात आज गणपती बाप्पा मोरया अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाला निरोप दिला.
तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. डगळे सर, सुधीर पराड सर, नामदेव डगळे सर यांचेही योगदान राहिले.
Discussion about this post