मोहोळ प्रतिनिधी/
मोहोळ तालुक्यातील उत्तर आणि पूर्व भागातील शेतकरी, विद्यार्थी,आणि सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंजूर केलेल्या अप्पर तहसील कार्यालयाचा शुभारंभ प्रगतशील शेतकरी कृषी भुषण दादा बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अनगर आणि परिसरातील तेरा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या अप्पर तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक आणि नायब तहसीलदार पदाचा अतिरिक्त कार्यभार मोहोळचे नायब तहसीलदार प्रवीण कुमार वराडे यांच्याकडे महाराष्ट्र शासनाने जिल्हाधिकार्यांच्या आदेशानुसार देण्यात आला.
कार्यालय शुभारंभानंतर नायब तहसीलदार पदाचा पदभार डॉ प्रवीण कुमार वराडे यांनी स्विकारला, यावेळी अप्पर तहसील कार्यालयासाठी शासनाने नियुक्त केलेल्या इतर कर्मचार्यांचेही यथोचित स्वागत आणि सन्मान कृषी भुषण दादा बोडके, रवि पाचपुंड, घाटुळे आदी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..
Discussion about this post