हातकणंगले तालुका प्रतिनिधी:- पट्टणकोडोली साक्षात विठ्ठल बिरूदेवाच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी काशी समजले जाणारे स्थान म्हणजे पट्टणकोडोली गाव.
गावामध्ये साक्षात हरीहाराचे अवतार असणारे विठ्ठल बिरदेव जागरूक देवस्थान आहे. अनन्यसाधारण महत्त्व असणारे या मंदिराला भेट देण्यासाठी मेघालय राज्याचे नवनिर्वाचित राज्यपाल माननीय श्री सी एच विजय शंकर साहेब शनिवार दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी पट्टणकोडोली येथे येणार आहेत.
त्यांच्या स्वागतासाठी गावामध्ये श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान मार्फत ढोल वादन व गजनृत्य असा सोहळा पार पडणार आहे. राज्यपालांच्या सुरक्षसाठी तटस्थ असा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे संस्कृती व देवाचा महिमा कळण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच आयोजन केले आहे अशी माहिती श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान समितीमार्फत देण्यात आले आहे.
राज्यपालांच्या स्वागतासाठी समस्त धनगर समाज व श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान यांच्यामार्फत सर्वांना हजर राहण्याचे आवाहन केले आहे.
Discussion about this post