आखाड्यातील कुस्तीगीर पहिलवानांचे माहेरघर अशी ख्याती असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील हर्सूल गावांतील नवसाला पावणाऱ्या जागृत अशा पावनपुण्य हरिसिद्धी मातेच्या भंडाऱ्या प्रसंगी आज छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार तथा राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री मा.श्री.संदिपानजी भुमरे साहेबांनी भेट देऊन हरिसिद्धी मातेचे दर्शन घेतले व उपस्थित सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या….
याप्रसंगी हर्सूल गांवचे नगरसेवक पुनमचंद बमणे, भाजपा तालुकाध्यक्ष शैलेश चौधरी, पत्रकार तथा शिवसैनिक संदिप मानकर, देवगिरी कारखान्याचे चेअरमन नंदू पा.पठाडे, सरपंच निवृत्ती मापारी आदींसहित पंचक्रोशीतून आलेल्या भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणांत उपस्थिती होती.
यांवेळी खासदार संदिपानजी भुमरे साहेबांनी हर्सूल गावांतील पहिलवानांच्या व्यायामशाळेसाठी 3 कोटी रुपये मंजूर केल्याचा शब्द उपस्थित पहिलवानांना व भाविक भक्तांना दिला…!!
Discussion about this post