जे बदलापुरात घडलं ते टिटवाळ्यात होऊन देणार नाही… टिटवाळा परिसरातील शाळांनी योग्य त्या उपाय योजना तात्काळ कराव्यात.– विजय देशेकर
टिटवाळा (कल्याण ) / प्रफुल्ल शेवाळे
संपूर्ण राज्याला हादरवून टाकणारी बदलापूर येथील लहान मुलींच्या अत्यचाराच्या घटने नंतर काल 20ऑगस्ट रोजी बदलापूर शहर अक्षरशः पेटून उठलं.. दिवसभर जन आंदोलन, रेल्वे रोको चालू होता. याच पार्शवभूमीवर टिटवाळा येथील शिवसेना उपशहर प्रमुख विजय देशेकर यांनी बदलापूर ला जे घडलं ते टिटवाळा मध्ये कदापि होऊ देणार नाही अशी कठोर भूमिका व्यक्त केली आहे, याकरिता टिटवाळा परिसरातील शाळांनी योग्य त्या उपाय योजना तात्काळ कराव्यात असा थेट इशारा विजय देशेकर यांनी शाळांना दिला आहे.
विजय देशेकर यांनी म्हटलंय कीं टिटवाळ्यातील सुज्ञ सुशिक्षित सुजाण पालकांनो जे काही आपल्या आजूबाजूला घडतय जस बदलापूरमध्ये घडल ते पाहून मनाला अक्षरशः चिड येते.आपण आपल्या मुलांना आपल्या परिसरातील ज्या शाळेत शिक्षण देतोय आणि त्यांच उज्वल भविष्याचे स्वप्न बघतोय नक्कीच त्या शाळेतील गुणवत्तेचा आणि सुरक्षेचा प्रश्न घेऊन तुमच्याशी संवाद साधतोय.
आपल्या मांडा टिटवाळा परिसरात ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्या सर्वांना यानिमित्ताने आव्हान वजा इशारा देतो की शनिवार दिनांक २४ ऑगस्ट २०२४ पर्यंत आपण खालील गोष्टींची पूर्तता आपल्या शाळेत आहे की नाही याबाबत खात्री करावी किंवा त्वरित त्या उपाययोजना करून घ्याव्यात. अन्यथा शनिवार पासून आम्ही आमच्या स्टाईलने आमच्या मुलांच्या भविष्यातील सुरक्षेच्या निमित्ताने कारवाई करू आणि मग होणाऱ्या परिणामास सर्वस्वी जबाबदारी ही आपलीच असेल हे लक्षात ठेवावे.
पुढील खालील मुद्द्यांवर सर्व शाळेतील प्रशासनाने लक्ष द्यावे.
शाळेच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे हे चांगल्या दर्जाचे व पुरेसे लावावे. तसेच प्रत्येक शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ प्रवेश घेताना महिला पुरुष सुरक्षा रक्षक हे असलेच पाहिजेत. शाळेत येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ही आपल्याकडे त्यांच्यामार्फत केलीच पाहिजे,शाळेतील सर्व कर्मचारी व शिक्षकांना गणवेश व कॅरेक्टर प्रमाणपत्र अनिवार्य करावे.यानंतर शाळेचा विद्यार्थी हा ज्या बसमधून ज्या वाहनाने ये-जा करतो त्या वाहनांचा आरटीओ प्रमाणपत्र त्या वाहन चालकाचा कॅरेक्टर प्रमाणपत्र त्या वाहन चालकाचे तसेच आतमध्ये असणाऱ्या ज्या वाहक मदतनीस त्यांना ड्रेस कोड,ओळखपत्र हे अनिवार्य आहेच त्यासोबत वाहन चालकाकडे देखील लायसन्स,बॅच व शाळेचे हजेरी बुक हे असलेच पाहिजे. तसेच बसमध्ये देखील वायरलेस सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचा थेट कंट्रोल हा संस्थाचालकांपर्यंत असलाच पाहिजे आणि रस्त्यावरची वेगमर्यादा तसेच जे प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांचे पालकांचे जे व्हाट्सअप ग्रुप आहेत ते फक्त ॲडमिन न ठेवता पालकांना देखील त्यांच्या मुलांच्या तक्रारी व अनुभव त्या ग्रुपवरुन शाळेत पोहोचले पाहिजेत म्हणून तो ग्रुप प्रत्येक पालकांसाठी खुला करण्यात यावा.
बहुतेक शाळांच्या बाहेर रोडरोमियो नशेबाज,कुमारवयीन मुल हे देखील फिरत असताना दिसतात तर शाळा प्रशासनाने याची तक्रार पोलिसांकडे करावी व पोलिसांना देखील विनंती आहे आपण देखील कोणत्याही तक्रारीची अपेक्षा न करता आपणास जर शाळेच्या बाहेर अस काही आढळल्यास आपण कारवाई करावी म्हणजे पुढील धोका टळेल.
तसेच प्रत्येक शाळेने दर महिन्याला शिक्षकांचा देखील प्रबोधनात्मक लेक्चर घ्यावे या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण शनिवार पर्यंत तातडीने याच्यावर कार्यवाही करावी ही अपेक्षा व्यक्त करतो अन्यथा आम्ही आमच्या स्टाईलने अनपेक्षितपणे कोणत्याही शाळेत जाऊन या खालील गोष्टींची शहानिशा करू व नसल्यास आमच्या पध्दतीने धडा शिकवण्यात येईल याची परत एकदा आपण नोंद घ्यावी.
वाहतूक पोलिसांना देखील विनंती आहे की आपण देखील ह्या ज्या शाळेच्या बसेस किंवा इतर गाड्यां चालतात यांच्यावर लक्ष ठेवावे आपल्या कंट्रोल मधील जे जे सीसीटीव्ही आहेत त्याच्या माध्यमातून देखील आपण यांवर कारवाई करू शकतात.
मांडा टिटवाळा व आजूबाजूच्या परिसरातील सर्वच पालकांना विनंती आहे की आपण सर्वांनी आमच्यासोबत ह्या लढ्यात सामील व्हा. ही लढाई आपल्या पाल्यांच्या सुरक्षेची आहे ही लढाई आपल्या पाल्याच्या अस्तित्वाची आहे याकडे कृपया लक्ष द्यावे.ही विनंती कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास आम्हाला संपर्क साधावा.
पालकांनो जागरुक व्हा मेणबती पेटवण्यापेक्षा आपल्या पाल्याना सक्षम बनवुया.
तसेच बदलापूर मधील माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटनेचा जाहीर निषेध 🏴 करूया..म्हणून आपण टिटवाळाकर म्हणुन दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता कल्याण तालुका पोलिस स्टेशन टिटवाळा येथे समक्ष भेटून निवेदन देणार आहोत ज्याना निवेदन द्यायला यायचे आहे त्यानी पोलिस स्टेशनला सोबत यावे.📃✒️
जनावरालाही लाजवेल एवढी विकृती माणसामध्ये येतेय.आणि बाल वयातील चिमुरडी त्याची शिकार होतेय…
या विकृतीला आपण वेळीच नष्ट केले पाहिजे.👿 एक जबाबदार भारतीय समाज आणि त्या समाजाचा एक हिस्सा म्हणून आपण अशा गोष्टींचा वेळोवेळी विरोध/निषेध केलाच पाहिजे.👊👋
अशी कडक भूमिका विजय देशेकर यांनी घेतली असल्याचे दिसून येत आहे.
संपर्क साठी -
श्री.विजय(भाऊ) मारुती देशेकर
७२०८१३६४११
Discussion about this post