

बोरगाव माळशिरस:-
दिनांक 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट रोजी बोरगांव मध्ये आर्ट ऑफ लिविंग चा हॅपिनेस प्रोग्रॅम आयोजित करण्यात आलेला होता या कोर्समध्ये बोरगांव व बोरगांव पंचक्रोशी मधील 35 साधक कोर्समध्ये सहभागी झालेले होते.
कोर्स साठी आर्ट ऑफ लिविंग चे वरिष्ठ टीचर श्री गोरख डांगे (मामा )यांचे मार्गदर्शन लाभले .हॅपिनेस प्रोग्रॅम मध्ये ध्यान ,योगा ,प्राणायाम , सेवा ,सत्संग आणि महत्त्वाचे सुदर्शन क्रिया या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन केले व त्याचे महत्त्व साधकांना सांगितले.
या कोर्स साठी श्री गोरख डांगे (मामा), डॉक्टर श्री मंगेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्येक साधकांनी 5 दिवसांमध्ये आपल्याला आलेला अनुभव सांगितला .
कार्यक्रमासाठी बोरगांव ग्रामपंचायत चे कै. मोहनराव पाटील सांस्कृतिक भवन उपलब्ध करून देण्यात आलेला होता.
आर्ट ऑफ लिविंग च्या हॅप्पीनेस प्रोग्रॅम चे आयोजन बोरगांव चे स्वयंसेवक श्री विकासबापू पाटील, श्री विराज पाटील ,श्री मंदार काकडे, श्री श्रीनिवास गायकवाड ,श्री सुरज पाटील यांच्याकडून आयोजन करण्यात आलेले होते यापुढेही असेच कोर्सचे आयोजन करण्यात येणार आहे असे या सर्व स्वयंसेवकांनी सांगितले.
Discussion about this post