ता. प्र. देविदास वायाळ
लोणार -लागूनच असलेल्या सिंदखेडराजा विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उ.बा.ठा.गटाच्या नेत्यांनी आज दि. १४/०९/२०२४ रोजी श्री क्षेत्र वरुडी येथील तेजस्वी बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन श्री क्षेत्र वरुडी या तीर्थ क्षेत्राहून मशाल यात्रेला सुरवात केली आहे.
मशाल यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद –
विधानसभा क्षेत्रातील श्री क्षेत्र वरुडी येथून निघालेल्या मशाल यात्रेला मतदारसंघातील जनतेने मशाल यात्रेत मोठ्या संख्येने सामील होऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.
सिंदखेडराजा मतदार संघांचे पसंतीचे उमेदवार म्हणून मा. दिलीपभाऊ वाघ वाघ यांना जनतेने दिले आशीर्वाद –
सिंदखेडराजा मतदारसंघातील लाडके, मनमिळाऊ व सामान्य जनतेसोबत मिळुनमिसळून असलेले धडाडीचे कार्य करणारे व पडतीच्या काळातही शिवसेना उ.बा.ठा.गटासोबत कायम ठाम उभे असलेले नेते म्हणजे मा. दिलीपभाऊ वाघ.आज त्यांच्या नेतृवात मशाल यात्रेला सुरवात झाली असता त्यांचेसोबत मतदारसंघातील जेष्ठ नेते मा. छगनभाऊ मेहेत्रे, मा. आशिषभाऊ रहाटे,मा. श्यामभाऊ निकम, मा. सुदाम वाघ,तसेच मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते, नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
Discussion about this post