वडवणी प्रतिनिधी:-प्रकाश शेंडगे.
वडवणी तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायत अंतर्गत तोळानाईक तांडा येथील १७ वर्पीय अल्पवयीन मुलीचा बाल विवाहाची माहिती बालविवाह प्रतिबंधक कार्यालय बीड येथील पथकाला मिळताच वडवणी पोलिस स्टेशनचे एपीआय यांनी घटनास्थळी धाव घेऊन तो बाल विवाह रोखला.त्या दोन्ही परिवाराला कायद्याचे नियम समजावून सांगत बालविवाह रोखला.
शासनाने बालविवाह रोखण्यासाठी एवढे कठोर पावले उचलूनही बालविवाह करण्याच धाडस ग्रामीण भागात नागरिक करत आहेत.
वडवणी तालुक्यातील तिगाव येथे बालविवाह होतं असल्याची माहिती बीडच्या पथकासह स्थानिक पोलीसांना मिळताच घटना स्थळी जाऊन सदरील बालविवाह रोखला असून कायद्याचे नियम समजावून सांगण्यात आले तेंव्हा दोन्ही परिवारानी समजूतदार पणा दाखवत विवाह न करण्याचा पवित्रा घेतला.दोन्ही पदकाने घटना स्थळी भेट दिली यावेळी बालविवाह होतं असल्याची प्रथमदर्शी दिसून आले.परंतू विवाह संपन्न झाला नव्हता तेव्हा प्रशासनाने दोन्ही परिवाराला बोलावून कायद्याचे नियमांचे पालन करू तसेच हा विवाह न करण्याचा निर्णय घेतला आहे.ही कामगिरी एस पी वर्षा व्हगाडे,तत्वसिल कांबळे व त्यांच्या सर्व स्टाफ,पी एस आय अमन सिरसट, ग्रामसेवक प्रमोद धुमाळ, यांच्यासह ग्रामसेवक पंचायत कर्मचारी उपस्थित होते.
Discussion about this post