दि.१९ सप्टेंबर
गगनबावडा प्रतिनिधी :- विधानसभा निवडणुका जवळ आल्याने सर्व पक्षातील आमदार पदाचे उमेदवार यांचे संपर्क दौरे सुरु झाले आहेत.
काँग्रेस पक्ष आणि मविआ पक्षाचे अधिकृत उमेदवार राहुल पी.एन.पाटील यांचा गगनबावडा तालुका संपर्क दौरा आज दि.१९ सप्टेंबर रोजी पासून सुरू झाला आहे.
आज दुपारी चार वाजता त्यांनी कोदे खुर्द गावातील दोन्ही गटातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी ते म्हणाले की,जसे माझे वडील स्वर्गीय.आ.पी.एन.पाटील यांना तुम्ही पाठिंबा दिला,त्यांना सहकार्य केले, तसेच मलाही तुमचा पाठिंबा,तुमचे सहकार्य आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बहुमत देऊन तुमची सेवा करण्याची संधी द्यावी. जसे माझे वडील तुमच्या कामासाठी दिवस-रात्र राबले,तसे मीही तुमची कामे करण्याचा प्रयत्न करेन.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, गोकुळचे संचालक मा.बयाजी शेळके यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.बजरंग पाटील, डॉ.डी.वाय.पाटील सह.साखर कारखान्याचे संचालक मा.सहदेव कृष्णा कांबळे, गोकुळचे संचालक मा.बयाजी शेळके,कोदे खोरीचे आधारस्तंभ मा.विलास पाटील साहेब आदि.मान्यवर तसेच गावातील दोन्ही गटातील कार्यकर्ते उपस्थित होते.

Discussion about this post