सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रामध्ये आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता (IAS) यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त वैभव साबळे यांच्या संयोजनामध्ये ‘स्वच्छता हि सेवा’ अभियानाची सुरुवात झाली. शालेय जीवनापासून स्वच्छतेचे महत्व प्रत्येकाला समजावे या उद्देशाने शाळांमधून या अभियानाची सुरुवात करण्यात आली जवळजवळ १२ शाळा मधील २५० विद्यार्थी विद्यार्थिनी नि मानवी साखळीद्वारे या अभियानामध्ये आपला सहभाग नोंदवला.
१९ सप्टेंबर पासून २ ऑकटोबर पर्यंत हे अभियान चालणार असुंन या अभियानांतर्गत विविध उपक्रम आणि महापालिका क्षेत्रामध्ये व्यापक स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार असून स्वतः आयुक्त शुभम गुप्ता हे या मोहिमेत सहभाग घेणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली. विद्यार्थ्यांची हि मानवी साखळी सांगली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम वर संपन्न झाली. या मानवी साखळीचे संयोजन क्रीडाधिकारी अहमद जेलर यांनी केले. या अभियानाचे संयोजन उपायुक्त वैभव साबळे यांच्या सह वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र ताटे महापालिकेचे ब्रँड अँबेसिडर पत्रकार दीपक चव्हाण आणि समन्वयक वर्षाराणी चव्हाण तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक करत आहेत.
दि. १९ सप्टेंबर २०२४ ते १ ओक्टोम्बर २०२४ या कालावधीमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ शपथ कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होणार असून या कालावधीत मनपा क्षेत्रातील विभागनिहाय ‘स्वच्छता ही सेवे’ ची माहिती देण्यात येणार आहे. आज दि २० सप्टेंबर २०२४ रोजी ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व एनजीओ ,सामाजिक संस्थांची बैठक घेण्यात येणार आहे. दि. २१ सप्टेंबर पासून दि.२८ पर्यंत प्रत्येक विभाग प्रमुखाने *एक पेड माँ के नाम ही मोहीम* राबवायची असल्याचे उपायुक्त वैभव साबळे यांनी यावेळी सांगितले. हि एक अभिनव कल्पना आयुक्त शुभम गुप्तांची असून महापालिकेतील सर्व कर्मचारी आणि अधिकारी हे प्रत्येकी एक झाड लावून आपल्या आई बदल आदर भावना व्यक्त करण्यात येणार असून त्याचे सेल्फी देखिल काढले जातील तसेच दि २४ रोजी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
बालगंधर्व येथे २६ सप्टेंबर रोजी आर्किटेक्चर कॉलेज तर्फे *टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा* आणि बचत गट यांच्यामार्फत *फूड स्ट्रीट स्पर्धा* आयोजित करण्यात येणार आहे. *टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा* सन्मानपत्र वितरण कार्यक्रम घेण्यात होणार आहे.
दि.२५/०९/२०२४ रोजी महापालिकेच्या वतीने निदान केंद्र येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. दि.३० सप्टेंबर २०२४ रोजी आरोग्य विभागातील ‘सफाई मित्रांना’ तसेच जलनिस:रण विभागातील सर्व सफाई मित्रांना PPE किट देण्यात येणार आहे. दि.१ओक्टोम्बर २०२४ रोजी सर्वोत्कृष्ट ‘सफाई मित्र’ घोषित करण्यात येणार आहे.दि.२ ऑक्टोंबर रोजी ‘स्वच्छ भारत दिवसाचे’ आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार सांगली येथील कोल्हापूर रोड , दूरदर्शन केंद्र या ठिकाणी महा स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे *एक पेड माँ के नाम ही मोहीम** राबविण्यात येणार येईल असे उपायुक्त वैभव साबळे यांनी नमूद केले. .
Discussion about this post