. पांढरकवडा श्री गणेश विसर्जनदरम्यान बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पथकाने जुगाऱ्यांचा रंगलेला एक्का बादशहाचा डाव उधळला. यावेळी त्यांनी नऊ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 94 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी (दि.18) मध्यरात्री 12.30 वाजताच्या सुमारास इंदिरानगरातकरण्यात आली. संजय दुधनाथ यादव (54 रा. सरदार पटेलवार्ड, पांढरकवडा), विनोद गंगाराम राजुरकर (42 रा. चंद्रशेखर वॉर्ड), शेख सलीम शेख जमाल (51 रा. वॉर्ड क. 6 इंदिरानगर), लक्ष्मण सिताराम बाभूळकर (49 रा. इंदिरानगर) राधेशाम नारायण वागदे (48 रा. इंदिरानगर) पीयूष चंद्रशेखर पोलाडीवार (35 रा.शामनगरी) गोविंद सतीश बबेरवाल (33 रा. शास्त्री वॉर्ड), शुभम मधुकर जुमळे (30 रा. सरदार पटेल वॉर्ड) मनोज गुप्ता (30 रा. चंद्रशेखर वॉर्ड) असे पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या जुगाऱ्यांचे नाव आहेत. सार्वजनिक ठिकाणी बसून पैशाची बाजी एक्का बादशहा नावाचा जुगाराचा खेळ खेळत होते. पोलिसांनी छापा टाकले असता जुगार खेळणारे काही जण पळाले. त्यांचा पाठलाग करून जुगार खेळणारे पांढरकवडा यांना ताब्यात घेतले व त्यांचे अंगझडतीत तसेच डावातील नगदी 32 हजार 300 रूपये 7 मोबाईलचे 62,500 रूपये व मोटारसायकलचे 1 लाख रूपये असा एकूण 1 लाख 94 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून जुगार खेळणाऱ्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले. जिल्ह्यात काही व्यक्तींचे जुगार मोठ्या प्रमाणात चालतात. जुगार अड्डे चालविण्यासाठी राजकीय पाठबळासोबतच पोलिस, महसूल आदी यंत्रणांची छुपी साथही घेतली जाते, असे बोलते जात आहे
Discussion about this post