किन्ही (जवादे)येथे विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात साजरी
विहिरगांव प्रतिनिधी- रजत चांदेकर
राळेगाव तालुक्यातील किन्ही येथे साई वेल्डिंग वर्कशॉप मध्ये मंगळवार ला भगवान श्री विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साई वेल्डिंग वर्कशॉप चे संचालक मंगेश मोहुर्ले तर प्रमुख पाहुणे म्हणून किरणं वानखेडे,अमोल कुळसंगे, अक्षय वाढई, संगीत धाबेकर, गजानन मेश्राम हे होते. मान्यवरांच्या हस्ते विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला मकरंद चहारे , प्रेम चांदेकर, मंगेश वाढई, महेश वाढई, यश मेश्राम, भोजराज पाचभाई, निवृत्ती वानखेडे , गौरव मांदाडे आदींची उपस्थिती होती.
Discussion about this post