सोनपेठ शहरात ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त भव्य मिरवणूक.
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिवसनिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उर्दू महिन्यातील 12 रब्बील अव्वल या तारखेला म्हणजे 16 सप्टेंबर 2024 रोजी मिरवणूक काढण्यात येत होती. परंतु यावर्षी प्रेषित मोहम्मद पैगंबर व श्रीगणेश मिरवणूक या एकाच दिवशी येत असल्यामुळे मुस्लिम बांधवांनी शहरामध्ये हिंदू मुस्लिम एकोपा आबादीत राहावा म्हणून प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी मिरवणूक ही दिनांक 20 सप्टेंबर रोजी साजरी केली.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांची जयंती मिरवणूक हि. ठरल्याप्रमाणे दिनांक 20 सप्टेंबर शुक्रवार रोजी सकाळी आठ वाजेपासून शहरातील मेहबूबपुरा मशिद व सोनखेड येथील जामामशिदी समोरून निळगूळवटा ते जुनी वेस बालेपीरमशिद समोरून जुने पोलीस स्टेशन रोड पासून वारीकगल्ली, मरकस मशिद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक,हजरत टिपू सुलतान चौक, रजा चौक च्या दिशेने इनामदार वस्ती, शहीद मुंजाभाऊ तेलभरे चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक या प्रमुख मार्गावरून नबी का दामन नही छोडेंगे व लबेऐक या रसूल अल्ला अशा घोषणा देत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान बालेपीर मशिद कमेठीतर्फे विविध प्रकारचे गोड पदार्थ व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
तर मिरवणुकीच्या सांगताप्रसंगी ऑफिस गफार यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर प्रवचन देऊन फातियाखानी करून उपस्थित नागरिकांना स्वादिष्ट शाकाहारी भोजन दालचा व गोड पदार्थाचा प्रसाद घेण्याचे आव्हान केले.या मिरवणुकीत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, काँग्रेसचे नेते सुमित भैय्या पवार, शिवाजीराव कदम, गणेश कदम, हाफिस गफार, हाफिज समीर, हाफिज मुश्ताक,हाफिज अली शेर कुरेशी,मौलाना समयोदिनकाजी,मौलाना आसिफ,मौलाना अफसर भाई. माजी नगरसेवक उस्मान बाबा कुरेशी,अब्दुल रहेमान,शेख नईम भाई,यूनूस शेख, निसार शेठ, मुन्शी भाई कुरेशी, कदीर अंसारी,साजेद कुरेशी,राजू सौदागर, शेख अजीम,गौस कुरेशी, सिद्धीक कुरेशी, खाजू कूरेशी, यांच्यासह मिरवणुकीत शहरातील तमाम मुस्लिम बांधव व इतर समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व तसेच मिरवणुकीसाठी सोनपेठ पोलिसांकडून चौक बंदोबस लावण्यात आला होता.
प्रतिनिधी:- अहमद अन्सारी पाथरी परभणी 7218275486.
Discussion about this post