



वणी–येथील शेतकरी मंदिर सभागृहात आज आयटक संलग्न सर्व युनियनच्या कामगार कर्मचारयांचा प्रचंड मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन आयटक राज्यसचिव कॉ.शाम काळे(नागपुर)यांनी केले.अध्यक्षस्थानी एम.एस.ई.बी वर्कर्स फेडरेशन व आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ.विजय ठाकरे(यवतमाळ) होते.मार्गदर्शक म्हणुन भाकपचे राष्ट्रीय कौंसिलर कॉ.तुकाराम
भस्मे(अमरावती),कॉ.अनिल हेपट,संयुक्त खदान मजदुर संघ(आयटक) वणी क्षेत्रचे अध्यक्ष कॉ.जियाउल्ला खान, आशा गटप्रवर्तक युनियनच्या सौ.निता सोयाम हे होते.मेळाव्यात कामगार कर्मचारी वर्गाच्या प्रलंबीत मागण्यावर चर्चा करून येणारया विधानसभा
निवडणुकीत विधानसभेत कामगारांचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉ.अनिल हेपट यांना आमदार म्हणुन निवडुन पाठविण्याचा निर्धार करण्यात आला.मेळाव्याची प्रस्तावना कॉ.अनिल घाटे यांनी,संचालन कॉ.संजय भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.बंडु गोलर यांनी केले.मेळाव्याला हजारो कामगार,कर्मचारी व भारतिय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post