
डहाणू, रायतळी येथे 23 सप्टेंबर. रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या मार्फत युवा मित्र मंडळ रायतळी डोंगरीपाडा यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात ११६ रुग्णांनी सहभाग घेतला. त्यातील नेत्र तपासणी ७८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.त्या मधून शस्त्रक्रिया रुग्ण १८,जनरल तपासणी रुग्ण ३८ तसेच चष्मे वाटप रुग्ण ३७ या शिबिराला सुरूवात जन नायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून शिबीराला सुरू करण्यात आली.

या शिबिरामध्ये उपस्थित युवा मित्र मंडळ रायतळी यांना सहकार्य करणारे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था डहाणू तालुका अध्यक्ष पिंटू रींजड, दुर्वेश दुबे,चंदू घाटाळ व आदी सदस्य, ग्रां.पं सदस्य भरत सुतार,सामाजिक कार्यकर्ते सुधीर उंबरसाडा ,युवा मित्र मंडळ अध्यक्ष सोनू आडगा,विजय आडगा, सुरेश अंबोलकर,जिव्या अंबोलकर,राजू धोडदे,लखमा पालकर,प्रकाश आडगा,नितेश अंबोलकर,मोहन आंबोलकर,किसन पालकर,मंगेश अंबोलकर,प्रविण करमोडा, नंदू गडग,गणेश गुहे आदी. सदस्य

या सर्वांनी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्या नेत्र तपासणी आणि आरोग्य तपासणी शिबिराला सर्व पाहुण्यांचे युवा मित्र मंडळाने आभार मानले.

Discussion about this post