बदलापूर प्रतिनिधी : मानवतेला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथील शाळेतील दोन मुलींच्या अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांचा गोळीबारात ठार झाला. तुरुंगातून पोलिस कोठडी नेण्यात येत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकाऊन घेतली आणि गोळीबार केला. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाला. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय जखमी झाला. त्यानंतर त्याला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.
कोर्टाकडून कोठडी मिळाल्यानंतर बदलापूर पोलीस अक्षय शिंदे याला ताब्यात घेण्यासाठी तळोजा तुरुंगात गेले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पोलीस त्याला तुरुंगातून घेऊन निघाले साडेसहाच्या सुमारास मुंब्रा येथे आले असता अक्षयने शेजारी बसलेल्या पोलिस अधिकाऱ्याकडील बंदुक हिसकाऊन घेतली आणि दोन गोळ्या झाडल्या. यात एक पोलिस अधिकारी जखमी झाले.
त्यानंतर सोबत असेल्लया पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी ३ गोळ्या झाडल्या आणि यात अक्षय जखमी झाला. त्याच्या डोक्याला एक गोळी तर शरीरावर दुसरी गोळी लागली. या घटनेनंतर पोलिसांनी अक्षय शिंदे तातडीने कळवा येथील रुग्णालयात नेले. तर जखमी पोलीस अधिकारी यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे. अक्षयने केलेल्या गोळीबारात त्यांच्या पायाला एक गोळी लागली आहे.
Discussion about this post