कळवण सुरगाणा तालुक्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भावी आमदार रमेश दादा थोरात यांनी गावागावांमध्ये जाऊन जनतेशी संवाद साधला. त्यांनी तालुक्यातील विविध गावांना कळवण शहर,मोकभनगी,देसराणे,रवळजी, खेडगाव,मानुर व इतर अनेक गावांना भेट दिली आणि तेथील स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांनी शेतकरी, महिला बचत गट, युवक, आणि वयोवृद्धांशी चर्चा करत त्यांच्या अडचणींची माहिती घेतली.
जनतेच्या समस्यांवर लक्ष देत, भावी आमदारांनी आपल्या पक्षाच्या योजना व धोरणे सादर केली आणि विकासाच्या दृष्टीने ठोस आश्वासनं दिली. त्यांनी खास करून रस्ते, पाणीपुरवठा, शेतीसाठी लागणारी सुविधा आणि शिक्षण या मुद्द्यांवर भर देण्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी भावी आमदारांसमोर विविध मागण्या मांडल्या आणि त्यांना निवडून दिल्यानंतर गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांची विनंती केली.
भावी आमदार रमेश भाऊ थोरात यांनी प्रत्येक गावाला आश्वासन दिले कि,ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत ते लवकरच सोडविण्यासाठी मी प्रयत्न करीन.
Discussion about this post