वाशिम प्रतिनिधी प्रवीण जोशी आ. लखन मलिक साहेब यांच्या प्रयत्नातून अंदाजे साडेतीन कोटी रुपये खर्च असलेला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालय पर्यंतच्या सिमेंट रस्त्याला मंजूरी मिळाली तसेच रस्त्याचे सिमेंटीकरण सुरु झाले. वाहतूकीचा रस्ता असल्याने रस्त्याचे काम जलद गतीने सुरु असून प्रथमदर्शनी रस्ता चांगला झाला असावा.
असे वाटते मात्र जेव्हा तो वाहतुकीसाठी खुला होईल तेव्हा कळेल की उड्डाण पुलावरील रस्त्यासारखा तर नाही ? मात्र रस्ता ओला असतांना काही बहाद्दरांनां त्या रस्त्यावरून आपली गाडी प्रथम नेण्याचा मोह आवरता आवरत नाही आणि जे नाही करायचे तेच घडते त्यावरून गाडी नेऊन तो रस्ता खराब केला जातो पण या गाडी नेणाऱ्यां ना हे कळत कसे नाही की त्या ओल्या रस्त्यावर उमटलेली गाडीच्या टायर ची चाकोली एखाद्याच्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. रस्ता तयार होत नाही की त्यावर बेफ़ामपणे गाडी चालवणाऱ्या सर्व लोकांवर ट्राफिक पोलिसांची करडी नजर असायला हवी जेणे करून अपघात होऊन स्पीड ब्रेकर चे काम पडणार नाही. आशा आहे या झालेल्या रस्त्यावर असा प्रकार होणार नाही आणि सर्व वाशीम कर व्यवस्थित वाहतुकीचे पालन करतील आणि अपघात टळतील .
येणाऱ्या काळात वाशिमचा विकास अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि विकसित वाशिम म्हणून नवी ओळख वाशिमला प्राप्त होईल असे काम लोक प्रतिनिधींनी करायला हवे आणि वाशिमची मागासलेला जिल्हा म्हणून असलेला शिक्का पुसून टाकावा ही सर्वस्वी जवाबदारी जनतेने पसंत केलेल्या लोक प्रतिनिधींची असते याची जाणीव जनप्रतिनिधींनी ठेवली की झाले . तूर्तास आपण अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही.
Discussion about this post