प्रतिनिधी /शिरूर अनंतपाळ.
वाल्मीक सूर्यवंशी
शिरूर अनंतपाळ तालुक्यातील सकल धनगर समाजा बांधवाच्या वतीने एस .टी. आरक्षण आमलबजावणी साठी लातूर सह विविध ठिकाणी सुरू असलेल्या अमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवार दि.23 रोजी आरीमोड येथे रस्तारोको अंदोलन करण्यात येणार आहे. शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याचे निरिक्षक श्री विठ्ठल दराडे यांना देण्यात आले.
सकल धनगर समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यभर चालू असलेले धनगर समाजाला अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण समाविष्ट करण्यात यावे यासाठी अंदोलन करण्यात येत आहे . निलंगा ते घरणी मार्गावरील आरीमोड येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे . तरी तालुक्यातील समाज बांधवानी या अंदोलनात भरपूर संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुकाराम काळे , महेश भिंगोले, शिवाजी हजारे , धनाजी महेक्रे , राजकुमार सोनटक्के यांनी केले आहे .
Discussion about this post