शेलगाव देशमुख येथे 15 सप्टेंबर 2024 च्या मध्यरात्री एक वाजल्यापासून धनगर समाज बांधव गजानन बोरकर हे मोबाईल टावर वर चढून धनगर समाज बांधवांच्या पंढरपूर येथे सुरू असलेल्या अनुसूचित जमाती आरक्षण अमलबजावणी मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या श्री दीपक भाऊ बोराडे व त्यांचे सहकारी यांना पाठिंबा म्हनून आंदोलन करत होते.पंढरपूर येथिल आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी.
आणि तसेच धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण घटनेत नमूद असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे गजानन बोरकर टॉवरवर बसून आंदोलन करत होते याची माहिती मेहकर प्रांताधिकारी (sdm ) श्री रवींद्र जोगी साहेब यांनी प्रभारी तहसीलदार श्री अजय पिंपरकर साहेब यांना शेलगाव देशमुख येथे आंदोलन करते गजानन भाऊ बोरकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठविले.
तत्काळ प्रभारी तहसीलदार श्री अजय पिंपरकर साहेब हे आंदोलन स्थळी पोहचले व त्या ठिकाणी उपस्थित असलेले डोंणगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार श्री नागरे साहेब यांचा मदतीने आंदोलन कर्ते गजानन बोरकर व इतर धनगर समाज बांधव यांच्यासोबत चर्चा करून समोर असलेल्या ईद आणि गणेश उत्सव यामुळे प्रशासनाला पोलिस यंत्रणेला अतिरिक्त ताण येत असल्यामुळे आपण आपले उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली व या विनंतीला मान देऊन प्रभारी तहसीलदार अजय पिंपळकर साहेब व डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री नागरे साहेब यांच्या विनंतीला मान देऊन.
टॉवर आंदोलन मागे घेण्यात येत आहे.अशी घोषणा गजानन बोरकर यांचे सहकारी श्री विनोद भुसारी यांनी पत्रकार आणि समाज बांधवांना केली. त्यानंतर श्री गजानन भाऊ बोरकर यांनी आंदोलन मागे घेतले.
आंदोलन स्थळे मेहकर तहसीलचे प्रभारी तहसीलदार श्री अजय पिंपरकर साहेब व डोणगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार नागरे साहेब व त्यांची टीम व मेहकर तहसीलचे सोनवणे साहेब मंडळ अधिकारी मेटांगळे साहेब हे उपस्थित होते तसेच शिवसेनेचे राजु भाऊ पळसकर केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव जाधव साहेब यांचे भाऊ विजुभाऊ जाधव यांनी भेट दिली व मंत्री महोदय यांच्याशी आपण चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले या आंदोलनाच्या ठिकाणी मुरलीधर लाभाडे गिलवरकर सर विनोद भुसारी धनंजय रोंदळे अश्रू शेळके एकनाथ खराट विनोद गोरे प्रल्हाद गोरे असे असंख्य समाज बांधव आणि पत्रकार उपस्थित होते.
Discussion about this post