• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेची राज्यात अव्वल झेप! … राज्यस्तरीय प्रथम सन्मानाने गौरव पनवेलची हरित कामगिरी ठरली सर्वोत्तम !

by
February 22, 2026
in *कोकण*, महाराष्ट्र
0
माझी वसुंधरा अभियानामध्ये पनवेल महानगरपालिकेची राज्यात अव्वल झेप! … राज्यस्तरीय प्रथम सन्मानाने गौरव पनवेलची हरित कामगिरी ठरली सर्वोत्तम !
0
SHARES
2
VIEWS
Ad 1

पनवेल प्रतिनिधी | संदिप जाधव

| पनवेलः पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाच्या दिशेने भरीव कामगिरी करत पनवेल महानगरपालिकाने “माझी वसुंधरा अभियान ५.०” अंतर्गत ‘अमृत शहरे’ (३ लाख ते १० लाख लोकसंख्या) गटामध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावून सर्वोत्तम हरित यश संपादन केले आहे.

RelatedPosts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

आज दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, वरळी, मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते हा मानाचा माझी वसुंधरा ४.० आणि ५.० अभियानाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पनवेल महानगरपालिकेचेवतीने महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, उपआयुक्त स्वरूप खारगे व उपआयुक्त डॉ. वैभव विधाते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

माझी वसुंधरा ५.० करिता एकूण ७ कोटी इतके बक्षीस जाहीर झाले असून यापूर्वीही माझी वसुंधरा ४.० करिता एकूण ७ कोटी इतके बक्षीस प्राप्त झाले आहे. शहरात विविध हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचे प्रकल्प, वृक्षारोपण तसेच वसुंधरेबाबत जनजागृती आदी उपक्रमांसाठी या निधीचा वापर करण्यात आला.

महानगरपालिकेने माझी वसुंधरा

अभियानांतर्गत केलेली कामगिरी

*भूमी या घटका अंतर्गत मनपाने वर्षभरात देशी प्रजातीच्या झाडांची लागवड केली. झाडाचे संगोपन करून त्यांना जगवले. कचऱ्याचे घरोघरी संकलन करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली. सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली होती.

*वायू या घटकात मनपाने अभियान कालावधीत हवेची गुणवत्ता तपासून त्यावर उपाययोजना केल्या. सण उत्सवात प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती करण्यात आली. सातत्याने स्वच्छता मोहिमा राबवतात शहरातील तयार होणारा बांधकाम, पाडकामाचा राडारोडा, कचरा उचलून विल्हेवाट लावण्यात आली.

*जल या घटकात मनपाने शहरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी उपाय योजना केल्या. शहरातील पाणीसाठ्यांची साफसफाई केली. शहरातील वडाळे तलाव व इतर तलावांमध्ये स्वच्छता करण्यात आली. सार्वजनिक इमारतीचे वाटर ऑडिट करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यात आले. गणपती विसर्जन दरम्यान जल प्रदूषण टाळण्यासाठी शहरात विविध ठिकाणी कृत्रिम कुंड तयार केले. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यासाठी नागरिकांना त्याचे फायदे तोटे समजावून सांगून इको फ्रेंडली मूर्तींच्या विक्रीसाठी व नागरिकांनी खरेदी करावी यासाठी प्रयत्न केले.

*अग्नी या घटकात मनपाने शहरात एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. शहरात विविध उद्यानात सोलर ट्री उभारले. विविध शासकीय इमारतींवर रूफ टॉप सोलार लावले. खाजगी तत्त्वावर घरांवर सोलर बसवण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच सार्वजनिक इमारतीचे एनर्जी ऑडिट करून त्यावर उपाययोजना केल्या.

*आकाश या घटकात मनपाने नागरीकांमध्ये अभियानाची माहिती पोहोचण्यासाठी स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करून जनजागृती केली. शहर हरित करण्यासाठी नागरिकांना व विद्यार्थ्यांना हरित शपथ दिली. शहरातील पर्यावरण प्रेमी व्यक्तींची पर्यावरण दूत म्हणून निवड करून विविध कार्यक्रमाद्वारे व त्यांच्या सहभागाने शहरात जनजागृती करत अभियानाचे उद्दिष्ट पूर्ण केले. या सर्व उपाययोजांमुळे महानगरपालिकेला या वर्षीही पुरस्कार मिळाला आहे.

महानगरपालिकेने ‘हरित पनवेल, स्वच्छ पनवेल, प्रगतीशील पनवेल’ या ध्येयवाक्याने नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवत पर्यावरण संरक्षणाला लोकचळवळीचे स्वरूप दिले. यामध्ये स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. या अभियानात प्रशासन आणि लोकसहभाग यांचा उत्कृष्ट समन्वय दिसून आला.

महापौर नितीन पाटील यांनी यावेळी सांगितले की, “हा सन्मान संपूर्ण पनवेलकरांचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतल्यामुळेच आज आपण राज्यात प्रथम क्रमांक पटकावू शकलो.”

आयुक्त मंगेश चितळे यांनी प्रशासनातील सर्व अधिकारी–कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांचे विशेष अभिनंदन करत भविष्यातही पर्यावरणपूरक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

“पर्यावरणीय शाश्वततेसाठी आखलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नियमित परीक्षण आणि पारदर्शक कामकाजामुळे पनवेल महानगरपालिकेला राज्यस्तरावर सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले” अशी भावना पर्यावरण विभागाचे उपायुक्त स्वरूप खारगे यांनी व्यक्त केली.

Previous Post

​किल्ले पारगड येथे गडपूजन सोहळा उत्साहात संपन्न; ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य: अपघातांना निमंत्रण

Related Posts

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.
महाराष्ट्र

नागावं छत्रपती संभाजी नगरयेथे प्लिटीक गोडाऊन ला आग लागली.

August 25, 2026
21
देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.
महाराष्ट्र

देवळी ता.मध्ये ग्रामीण भागात पूर्ण खड्ड्यात खड्डे पडले आहे.

August 24, 2026
59
परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …
महाराष्ट्र

परीट समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमण …

August 17, 2026
4
साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;
ताज्या घडामोडी

साटेली-भेडशी येथे सुसाट मोटारसायकलचा भीषण अपघात;

August 16, 2026
198
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;
महाराष्ट्र

९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हारमध्ये हजारोंची भव्य रॅली;

August 16, 2026
6
मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
महाराष्ट्र

मानवत शहरात विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
19
Next Post
कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य: अपघातांना निमंत्रण

कमान वेस ते ऑक्सिजन पार्क रस्त्याचे भाग्य कधी उजाडणार ? रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य: अपघातांना निमंत्रण

ताज्या बातम्या

बाहेर तालीम तरुण मंडळातर्फे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर

September 17, 2026
तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

तापी नदीवरील जुन्या पुलाची तातडीने दुरुस्ती करा : भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील यांची मागणी

September 15, 2026

बीजगणपती निर्मितीतून विद्यार्थ्यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश

September 15, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In